---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला अनेक विजय मिळवून देणार हा खेळाडू- रिकी पाॅंटिंग

On: गुरूवार, डिसेंबर 26, 2019 3:51 PM
---Advertisement---

गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020च्या 13 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला.  या लिलावात सर्व फ्रेंचायझींनी (संघांनी) खेळाडूंवर बोली लावत अंतिम संघ पूर्ण केला.

या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 8 नव्या खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. यामध्ये एक असा क्रिकेटपटू आहे जो सध्या फाॅर्ममध्ये आहे. तसेच, दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाॅंटिंगला (Ricky Ponting) विश्वास आहे की, हा खेळाडू संघाला अनेक सामन्यात विजय मिळवून देईल.

पाॅंटिंगने ऑस्ट्रेलियाच्या यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरीची (Alex Carey) प्रशंसा केली आहे. ऍलेक्सने बिग बॅश लीगमध्ये स्ट्राईकर्सविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 24 चेंडूत 55 धावा केल्या होत्या.

ही उत्कृष्ट खेळी पाहून पाॅंटिंग सोमवारी म्हणाला की, “ऍलेक्स कॅरी ज्या प्रकारे बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे, त्यामुळेच आयपीएलमध्ये मी आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऍलेक्स कॅरीला संघात सामील करणार होतो.”

अलेक्सची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. त्याला विकत घेण्यासाठी राजस्थान राॅयल्स (Rajasthan Royals) आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) स्पर्धा लागली होती. परंतु, शेवटी दिल्ली कॅपिटल्सने 2.40 कोटींची बोली लावत अलेक्सला आपल्या संघात सामील करून घेतले.

“ऍलेक्स फिरकी गोलंदाजी चांगली खेळणारा खेळाडू आहे. तसेच, त्याला चांगले आणि जबाबदारीने क्रिकेट खेळण्याची बुद्धी देखील मिळाली आहे. मला असे वाटते की, तो आम्हाला खूप सारे सामने जिंकून देऊ शकतो,” असे पाॅंटिंग म्हणाला.

“जर आम्हाला आमचा सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडून अपेक्षित कामगिरी मिळाली नाही तर ऍलेक्स आमच्या संघासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडू शकतो,” असेही पाॅंटिंग यावेळी म्हणाला.

आयपीएल 2020साठी असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ-

श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, पृथ्वी शॉ, आर अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोईनिस आणि ललित यादव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---