बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. ज्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाला दशकानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करण्यात यश आले. देशातील आणि जगातील प्रत्येक महान क्रिकेटर टीम इंडियाच्या या दारुण पराभवाचे विश्लेषण करत आहे. आता त्यात रिकी पाँटिंगचेही नाव जोडले गेले आहे. भारतीय संघाच्या निवडकर्त्याबद्दल चिंता व्यक्त करताना पाँटिंग म्हणाला की, संघात एका खास गोलंदाजाचा समावेश करून टीम इंडिया ही मालिका जिंकू शकली असती.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियात न पाठवण्याच्या निर्णयावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शमी संघात असता तर भारताची स्थिती अधिक चांगली होऊ शकली असती आणि निकाल वेगळा लागला असता असे या दोघांचे मत आहे.
आयसीसीच्या आढावा बैठकीत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, मी शमीला संघात ठेवले असते, त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी त्याला सर्वोत्तम फिजिओकडे पाठवले असते आणि तो खेळू शकतो की नाही हे तिसऱ्या कसोटीनंतर ठरवले असते.
रिकी पाँटिंगनेही रवी शास्त्रीच्या मताशी सहमती दर्शवली आणि म्हणाला, “मला आश्चर्य वाटले की शमीला मालिकेच्या मध्यभागीही ऑस्ट्रेलियाला पाठवले गेले नाही. जरी तो पूर्णपणे तंदुरुस्त नसला तरीही तो कमी षटके टाकून एक महत्त्वाचा पर्याय बनू शकला असता. भारतीय संघात नितीश रेड्डीसारखा अष्टपैलू खेळाडू आधीच होता आणि जर शमीला कमी षटके टाकण्याची संधी मिळाली असती तर तो भारतासाठी फरक पाडला असता.
तो पुढे असेही म्हणाला, “शमी, बुमराह आणि सिराज संघात असते तर निकाल पूर्णपणे वेगळा असू शकला असता. हे तीन गोलंदाज असणे भारतासाठी खूप महत्त्वाचे होते.”
वनडे विश्वचषक 2023 च्या फायनलनंतर मोहम्मद शमीने कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. कारण 2024च्या सुरुवातीला त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करावी लागली. तथापि, त्याने कसोटी मालिकेपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला. ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियात खेळू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण मेलबर्नमधील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी शमीच्या गुडघ्याला सूज आल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेच्या मध्यांत बोलावता आले नाही.
हेही वाचा-
हा खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पात्र नाही, पण तरीही त्याला संधी मिळणार
गौतम गंभीरचं पद धोक्यात? बीसीसीआय लवकरच पाहणार रिपोर्ट कार्ड!
गिल ‘ओव्हररेटेड’ खेळाडू, त्याच्या जागी ऋतुराज….’, माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’ला सुनावले