कोणत्याही क्रिकेट सामन्यादरम्यान छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद-विवाद होताना दिसतात. आयपीएल २०२२मध्ये पंचांच्या निर्णयावरून बऱ्याचदा वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. शनिवारी (१४ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२२चा ६१ वा सामना झाला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेला हा सामना रोमांचक राहिला. या सामन्यादरम्यान कोलकाताचा फलंदाज रिंकू सिंग याच्यामुळे मैदानावर गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
तर झाले असे की, कोलकाताचा (Kolkata Knight Riders) संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. संघाचे आघाडीचे ४ फलंदाज बाद झाल्यानंतर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. परंतु तो संघासाठी अपेक्षित योगदान देऊ शकला नाही. ६ चेंडू खेळताना त्याला केवळ ५ धावा करता आल्या.
१२व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हैदराबादच्या टी नटराजनने त्याला पायचित केले. पंचांनीही नटराजनच्या अपीलवर रिंकू सिंगला त्वरित पायचित घोषित केले. परंतु रिंकू सिंग (Rinku Singh) पंचांच्या या निर्णयाने नाखुश दिसला. तो या निर्णयाविरोधात डीआरएस घेऊ इच्छित होता. परंतु १५ सेंकदांची वेळ टळून गेली होती आणि त्याने पंचांकडे कसलाही इशारा केला नव्हता. मात्र त्याच्या बोलण्यातून त्याने डीआरएससाठी (DRS Issue) इशारा केल्याचे समजत होते. याचमुळे तो खेळपट्टीवर अडून बसला होता. या सर्व गोंधळामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबला होता.
https://twitter.com/AwaaraHoon/status/1525492318782259200?s=20&t=wqxnaKVuOhPquKRkSjGK4g
Rinku Singh after being given out, wanted to take the DRS, but the 15 seconds were over. pic.twitter.com/F1xh5ffsTm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 14, 2022
दरम्यान कोलकाता संघाच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, आंद्रे रसेलला वगळता कोलकाताचे इतर फलंदाजही फेल ठरले. आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्जने संघाचा धावफलक पुढे नेण्यात योगदान दिले. रसेलने २८ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावांची झंझावाती खेळी केली. तर बिलिंग्जनेही १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा जोडल्या.
या दोघांव्यतिरिक्त कोलकाता संघाचे इतर फलंदाज विशेष खेळी खेळू शकले नाहीत. सलामीवीर वेंकटेश फक्त ७ धावांवर बाद झाला. नितीश राणा (२६ धावा), कर्णधार श्रेयस अय्यर (१५ धावा) आणि रिंकू सिंग (५ धावा) यांनी निराशा केली. कोलकाता संघाला २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावत १७७ धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA: आयपीएलदरम्यान होणार बैठक, रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार
निवृत्तीनंतर यूटर्न घेणारा रायुडू पहिलाच नव्हे, ‘या’ ५ क्रिकेटर्सनीही निर्णय बदलत केले होते पुनरागमन