---Advertisement---

ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच

On: शुक्रवार, ऑगस्ट 30, 2024 10:02 AM
---Advertisement---

यूपी टी20 लीग 2024 चा 9 वा सामना 29 ऑगस्ट रोजी नोएडा सुपर किंग्ज आणि मेरठ मावेरिक्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मेरठ संघानं कर्णधार रिंकू सिंहच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 11 धावांनी शानदार विजय मिळवला.

लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नोएडाचा कर्णधार नितीश राणानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या षटकांमध्ये राणाचा हा निर्णय योग्य ठरेल असं वाटत होतं. परंतु खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रिंकू सिंहनं 182.85 च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 64 धावा ठोकून सामन्याची दिशाच बदलली. रिंकूनं आपल्या फक्त 35 चेंडूच्या खेळीत 5 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार हाणले.

रिंकू सिंहच्या या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मेरठ मॅवेरिक्स संघानं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 163 धावा केल्या. नोएडाकडून नमन तिवारी आणि कुणाल त्यागी हे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या.

मेरठनं दिलेल्या 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नोएडाचा संपूर्ण संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 152 धावांपर्यंत मजल मारू शकला. संघासाठी डावाची सुरुवात करताना काव्य तेवतियानं 45 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र तो संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला.

मेरठ मावेरिक्सकडून विजय कुमारनं 3 बळी घेतले. तर फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंहनं गोलंदाजीतही कहर केला. त्यानं 3 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. काव्य तेवतिया व्यतिरिक्त त्यानं कर्णधार नितीश राणाचीही विकेट घेतली.

हेही वाचा – 

कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं सर्वात कठीण जातं? जसप्रीत बुमराहनं दिलं अनोखं उत्तर
लज्जास्पद! विदेशात खेळायला गेलेले 3 पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतलेच नाहीत
जो रुटनं आणखी एक शतक ठोकून मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड! कोहली अजूनही कोसो दूर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---