रविवारी (9 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंग याने अविश्वसनीय खेळी केली. शेवटच्या पाच चेंडूंवर पाच षटकार मारून रिंकून केकेआरला विजय मिळवून दिली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला या सामन्यात 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. रिंकू सिंग आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू ठरला आहे.
रविवारी दुपारी 3.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना सुरू झाला. विजय शंकर (Vijay Shankar) याने शेवटच्या दोन षटकात गुजरातसाठी तोडफोड खेळी करून धावसंख्या 4 बाद 204 पर्यंत नेली. पण प्रत्येत्तरात रिंकू सिंग (Rinku Singh) याने केलेल्या प्रदर्शनामुळे इतर सर्वांचेच प्रदर्शन सुमार पडले. रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा कुटल्या. विशेष म्हणजे शेवटच्या सात चेंडूंपैकी सहा चेंडूंवर त्याने षटकार मारले. शेवटच्या षटकात विजयासाठी केकेआरला 29 धावांची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवर उमेश यादव याने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. पुढच्या पाचही चेंडूवर रिंकूने पाच षटकार मारत केकेआरला जबरदस्त विजय मिळवून दिला. यश दयाल या षटकात गोलंदाजी करत होता.
शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून संघाला विजय मिळवून देणाऱ्यांमध्ये रिंकू पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये एकाही खेळाडूने शेवटच्या षटकात पाच षटकार मारून सामना जिंकला नव्हता. रिंकू रविवारी ठोकलेल्या सलग पाच षटकारांच्या जोरावर यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी आयपीएल 2022मध्ये डेविड मिलर आणि राशिद खान यांनी शेवटच्या षटकात तीन-तीन षटकार मारली सामना जिंकला होता. आयपीएल 2020मध्ये अक्षर पटेलने तीन षटकार मारून विजय मिळवला होता. तसेच दिग्गज एमएस धोनी याने 2016 साली शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकले आणि सीएसकेला विजय मिळवून दिला होता.
शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून विजय मिळवणारे खेळाडू (आयपीएलमध्ये)
5 – रिंकू सिंग विरुद्ध गुजरात टायटन्स, 2023*
3 – डेविड मिलर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2022
3 – राशिद खान विरुद्ध रनसाझर्स हैदराबाद, 2022
3 – अक्षर पटेल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 2020
3 – एमएस धोनी विरुद्ध पंजाब किंग्ज, 2016
https://twitter.com/IPL/status/1645065394963746817?s=20
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात गुजरातचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या खेळत नव्हता. हार्दिकच्या अनुपस्थितीत राशिद खान (Rashid Khan) याने संघाचे नेतृत्व केले. राशिदने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, त्यादेखील लागोपाट चेंडूंवर. केकेआरच्या डावातील 17व्या षटकात राशित गोलंदाजीला आला. षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूंवर त्याने विकेट घेत आपली हॅट्रिक पूर्ण केली. मात्र, राशिदचे हे अप्रतिम प्रदर्शन गुजरात संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. (Rinku Singh becomes first player in IPL to hit five sixes in last over to win match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग तीन पराभवानंतर संतापले दिल्लीचे संघमालक! ट्विट करत आपल्याच संघावर ‘या’ शब्दांत बरसले
राशिदने केली करामत! केकेआरविरुद्ध घेतली ‘ऐतिहासिक’ हॅट्रिक,आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच






