IPLक्रिकेटटॉप बातम्या

रिंकू सिंहनं तोडली विराट कोहलीनं गिफ्ट केलेली बॅट, पुन्हा गेला मागायला तर कोहलीनं काय प्रतिक्रिया दिली? पाहा VIDEO

कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये केकेआरचा फलंदाज रिंकू सिंह आणि आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यामध्ये एक मजेदार संभाषण झालं. हे संभाषण मजेदार तर होतंच, मात्र विराट कोहलीसाठी ते थोडं अस्वस्थ करण्यासारखं होतं. वास्तविक, रिंकू सिंह हा विराट कोहलीला त्याची बॅट मागत होता.

रिंकूनं सांगितलं की, त्यानं आयपीएलमध्ये स्पिनर विरुद्ध फलंदाजी करताना बॅट तोडली. त्यानंतर आता तो विराट कोहलीकडे नव्या बॅटसाठी मागणी करत आहे. ही संपूर्ण घटना केकेआरच्या कॅमेरामॅननं कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडिओमध्ये रिंकू सिंह विराट कोहलीला सांगताना दिसतो की, त्यानं आधी दिलेली बॅट तोडून टाकली आहे. रिंकू विराट कोहलीच्या दोन बॅटकडे पाहत असतो. यावर थोडासा नाराज झालेला कोहली रिंकूला विचारतो की, ती बॅट कुठे गेली आणि काय तु मला दुसरी बॅट मागत आहे?

उत्तर देण्यापूर्वी विराट रिंकूला मजेशीर अंदाजात म्हणतो की, जर त्यानं दोन सामन्यांमध्ये रिंकूला दोन बॅट दिल्या तर त्याला स्पर्धेच्या पुढच्या सामन्यांमध्ये अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

ही संपूर्ण घटना केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्याच्या पूर्वी घडली. हा सामना आज (21 एप्रिल) कोलकाताचं होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन मैदानावर खेळला जात आहे. याआधी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआरनं आरसीबीचा दारूण पराभव केला होता. याच सामन्यानंतर विराट कोहलीनं रिंकू सिंहला आपली बॅट गिफ्ट दिली होती.

 

बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 विकेट गमावून 182 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहलीनं 59 चेंडूत नाबाद 83 धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात, केकेआरनं अवघ्या 16.5 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. केकेआरकडून सुनील नारायणनं 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 47 धावा ठोकल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

केकेआरविरुद्ध आरसीबीनं जिंकला टॉस, सिराज, ग्रीन संघात परतले; जाणून घ्या प्लेइंग 11

धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैद्राबादला दिल्लीच्या ‘या’ 22 वर्षीय पठ्ठ्याने चोप चोप चोपले ! रचला मोठा विक्रम

नटराजनची घातक गोलंदाजी, हैदराबादनं नोंदवला सलग चौथा विजय; घरच्या मैदानावर दिल्लीचा लाजिरवाणा पराभव

 

Related Articles