भारताचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंहचा प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा झाला असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रिया या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूचा साखरपुडा काही दिवसांपूर्वीच झाला. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
गेल्या काही वर्षांत रिंकूनं आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तो गेल्या 2 वर्षांत भारतासाठीही खेळला आणि त्यानं भारतीय संघाला अनेक सामने जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो भारताच्या टी20 संघाचा नियमित सदस्य आहे. प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. 2024 मध्ये त्या वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी खासदार बनल्या. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या सरोज यांनी काही काळ सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केलं आहे.
प्रिया सरोज यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1998 रोजी प्रयागराज येथे झाला. त्या उत्तर प्रदेशातून तीन वेळा खासदार राहिलेले आणि सध्या आमदार असलेले दिग्गज नेते तूफानी सरोज यांच्या कन्या आहेत. प्रिया यांनी त्यांचं शालेय शिक्षण एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी आणि अॅमिटी विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. प्रिया सरोज यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते बीपी सरोज यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्या देशातील दुसऱ्या सर्वात तरुण खासदार आहेत.
रिंकू सिंह बद्दल बोलायचं झाल्यास, या डावखुऱ्या फलंदाजानं नोव्हेंबर 2024 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला. तो लवकरच भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत खेळताना दिसणार आहे. रिंकूनं भारतासाठी 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये 55 धावा आणि 30 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 507 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
किरॉन पोलार्डनं इतिहास रचला! टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच
संजू सॅमसन चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर? एकदिवसीय कारकिर्दही धोक्यात! बीसीसीआय चौकशी करणार
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाला आणखी एक धक्का, हा खेळाडूही दुखापती