आर अश्विन याने युवा भारतीय फलंदाज रिंकू सिंग याचे कौतुक केले आहे. रिंकू जेव्हापासून भारतीय संघामध्ये सामील झाला आहे, तेव्हापासून तो सर्वांची मने जिंकत आहे. सामना संपवण्याची रिंकूची क्षमता त्याला फिनिशर म्हणून प्रसिद्ध करत आहे. रिंकूला फिनिशिंग टच देऊन भारतीय स्टार फिरकीपटू आर अश्विनने त्याची तुलना डावखुरा एमएस धोनी अशी केली आहे. म्हणजेच अश्विनला रिंकू सिंगमध्ये धोनीची झलक दिसत आहे.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, आर अश्विन म्हणाला, “तो असा आहे की, ज्याला मी डावखुरा धोनी म्हणेन. मी त्याची तुलना धोनीशी करू शकत नाही कारण तो खूप मोठा आहे. पण मी त्याने दाखवलेल्या संयमाबद्दल बोलत आहे. त्याने यूपीसाठी सतत धावा केल्या आणि भारतीय संघामध्ये येण्याचा मार्ग सोपा केला.”
तो पुढे म्हणाला, “रिकूनने दाखवून दिले की, भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि डाव पूर्ण करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. संघ प्रथम फलंदाजी करत असेल किंवा पाठलाग करत असेल तरीही त्याचा संयम बदलत नाही. डावाच्या शेवटी तो त्याचा खेळ पूर्णपणे बदलत असतो.”
भारतीय संघाने बुधवारी (17 जानेवारी) अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये रोहित शर्मासह रिंकू सिंगच्या अविश्वसनीय खेळीचा समावेश होता. रोहित शर्माने 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 121 धावांची खेळी केली. यादरम्यान कर्णधार रोहितला साथ देणाऱ्या रिंकूने 39 चेंडूंत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. रिंकू आणि रोहितने ही खेळी खेळली होती जेव्हा भारताने 4.3 षटकात केवळ 22 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. 4 विकेट पडल्यानंतर, रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी केली. (Rinku Singh is left-handed MS Dhoni see why R Ashwin made such a big claim)
हेही वाचा
टाटा समूहच राहणार आयपीएलचे टायटल स्पॉन्सर! 5 वर्षांसाठी तब्बल ‘एवढ्या’ हजार कोटींची लावली बोली
शमी-सूर्यानंतर आता बीसीसीआयने रिषभ पंतबाबत घेतला मोठा निर्णय, वाचाच