जगभरातून प्रेम मिळत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा आता शेवटाकडे जात आहे. आतापर्यंत हंगामातील 61 सामने पार पडले आहेत. यादरम्यान एकापेक्षा एक रंजक सामने पाहायला मिळाले आहेत. अशातच क्रिकेट चाहत्यांच्या मनात हा प्रश्न घोंगावत आहे की, आयपीएल 2023 स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशर कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने दिले आहे. आयपीएल 2023मध्ये समालोचक आणि विशेषज्ञ म्हणून काम करत असलेल्या चोप्राने स्पर्धेवर बारीक नजर ठेवली आहे. तसेच, त्याने आता स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशरचेही नाव सांगितले आहे.
आता तुम्हालाही वाटू शकते की, आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने महेंद्र सिंग धोनी, डेविड मिलर, निकोलस पूरन, हेन्रीच क्लासेन किंवा टीम डेविड या विस्फोटक खेळाडूंची नावे घेतली असतील. मात्र, यापैकी एकाही खेळाडूचे नाव चोप्राने घेतले नाही. त्याने आयपीएल 2023 स्पर्धेतील सर्वोत्तम फिनिशर म्हणून केकेआर (KKR) संघाचा विस्फोटक फलंदाज रिंकू सिंग (Rinku Singh) याचे नाव घेतले आहे.
रविवारी (दि. 14 मे) आकाश चोप्रा याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. यामध्ये त्याने रिंकू सिंग याची प्रशंसा करत त्याला सर्वोत्तम फिनिशर म्हटले. त्याने लिहिले की, “रिंकू सिंग आयपीएल 2023मधील सर्वोत्तम फिनिशर आहे.” यासोबतच त्याने रिंकूची आव्हानाचा पाठलाग करतानाची आकडेवारीही शेअर केली.
Rinku Singh is the best finisher in this season’s IPL. 🙇♂️
— Aakash Chopra (@cricketaakash) May 14, 2023
रिंकू सिंग याच्या आयपीएल 2023 स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 6 डावात 119च्या सरासरीने आणि 167.60च्या स्ट्राईक रेटने 238 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. ही आकडेवारी रिंकूची क्षमता दाखवते.
Won’t do more digging. I rest my case. Now, forget about the top three names…please share the second best in this IPL. Average. SR. 50s. Only one caveat—please share the names who bat at the number Rinku bats or lower. Thanks 🙏 https://t.co/hHMM4pcMwA pic.twitter.com/5qYuFi0yGK
— Aakash Chopra (@cricketaakash) May 15, 2023
सामन्यातील कामगिरी
रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने दणदणीत विजय मिळवला. हा सामना कोलकाताने 6 विकेट्सने जिंकत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात रिंकू सिंग याने 43 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली. तसेच, त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार नितीश राणा यानेही 44 चेंडूत नाबाद 57 धावा चोपल्या. या दोघांच्या जोरावर केकेआर संघाने 18.3 षटकात 145 धावांचे आव्हान पार करत चेन्नईच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा लांबवल्या. (rinku singh is the best finisher in this season of ipl aakash chopra know why)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या–
बॉलबॉय ते सीएसकेचा ट्रम्पकार्ड असा प्रवास करणारा तुषार देशपांडे
आयपीएल 2023: 10 पैकी 6 संघ अजूनही होऊ शकतात प्ले-ॲाफ्सला पात्र, अशी आहेत समीकरणे