भारताचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगची शुक्रवारी आगामी विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेत कर्णधार होणार आहे. तो नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशचे कर्णधार भुवनेश्वर कुमारची जागा घेणार आहे. रिंकू सिंगच्या नेतृत्वाखाली मेरठ मावेरिक्सने या वर्षाच्या सुरुवातीला यूपी टी20 लीगचे विजेतेपद जिंकले. अश्या परिस्थितीत तो त्याच्या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, रिंकू म्हणाला, “यूपी टी20 लीगमध्ये मेरठ मॅवेरिक्सचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी मोठी संधी होती आणि मला आनंद आहे की मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. मला कर्णधारपद खूप आवडते कारण त्यातून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या”.
रिंकू सिंग आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळते. रिंकू व्यतिरिक्त या फ्रँचायझीने सुनील नारायण, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती आणि रमणदीप सिंग यांना कायम ठेवले होते. रिंकूने आतापर्यंत 52 लिस्ट ए सामन्यात 1899 धावा केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशचा पहिला सामना आज 21 डिसेंबरला जम्मू-काश्मीरविरुद्ध होणार आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने यंदाचा चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आहे, त्यामुळे आगामी हंगामात संघाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूसोबतच संघात 23.75 कोटी रुपये किमतीचा व्यंकटेश अय्यरही आहे. जो कर्णधारपदाचा दावेदार आहे, पण रिंकू सिंगला देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करून या यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची मोठी संधी आहे.
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर आयसीसीची कारवाई, एक चूक पडली महागात
एमसीए अधिकाऱ्याच्या टीकेला पृथ्वी शॉचं उत्तर, इंस्टा स्टोरी टाकून केला पलटवार
भारताला मिळाली ‘लेडी झहीर खान’! मास्टर ब्लास्टरने शेअर केला बॉलिंगचा भन्नाट व्हिडिओ