देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी (Duleeep Trophy) (5 सप्टेंबरपासून) भारतात सुरू होणार आहे. बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी 4 संघांची घोषणा केली आहे. या संघात रिंकूला स्थान मिळू शकले नाही. रिंकू संघात नसल्यानंतर कसोटी फॉरमॅटमध्ये निवड समिती त्याच्याकडे पाहत नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, आता रिंकूनं संघात निवड न होण्याचं कारण सांगितलं आहे.
रिंकू सिंगनं (Rinku Singh) ‘स्पोर्ट्स तक’ संवाद साधताना सांगितले की, “मी देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही आणि रणजीमध्येही मी बरेच सामने खेळलेले नाही. मी फक्त 2 ते 3 सामने खेळलो.” मात्र, रिंकूनं रेड बॉल स्पर्धेत आपल्या निवडीबाबत आशा सोडलेली नाही. तो म्हणाला की, “मी चांगली कामगिरी केली नाही म्हणून माझी निवड झाली नाही, कदाचित पुढील फेरीच्या सामन्यांसाठी माझी निवड होईल.”
रिंकूनं फेब्रुवारी 2024 मध्ये शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला होता. त्याचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यानं 47 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 54.70च्या सरासरीनं 3,173 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 7 शतकं आणि 20 अर्धशतकं झळकावली आहेत. लिस्ट-ए च्या 57 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1,899 धावा आहेत. त्यानं लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे (5 सप्टेंबरपासून) दुलीप ट्रॉफीचे (Duleep Trophy) आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचे अनेक स्टार खेळाडू जसे की, शुबमन गिल, केएल राहुल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात परतणार शमी? जय शहा म्हणाले…
रिंकू सिंगनंतर केकेआरच्या ‘या’ खेळाडूने आरसीबीकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा
बांगलादेश मालिकेपूर्वी भारताचा स्टार अष्टपैलू घेतोय सुट्ट्यांचा आनंद…!