कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या विजयाचा नायक राहिला, रिंकू सिंग. २४ वर्षीय रिंकूने शेवटच्या षटकात धुव्वादार खेळी करत संघाला हंगामातील चौथा सामना जिंकून दिला. त्याच्या या मॅच विनिंग खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात (Rinku Singh Player Of The Match) आले.
दरम्यान सामन्यानंतर रिंकूने (Rinku Rajguru) मोठा खुलासा केला आहे. त्याने सामन्यापूर्वी स्वत:ला एक वचन दिले होते, जे त्याने खरेही करून दाखवले आहे. याबाबत त्याने स्वत: माहिती दिली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रिंकूने त्याच्या हातावर लिहिला होता असे काही
सामन्यानंतर कोलकाता फ्रँचायझीने रिंकूचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिंकू संघ सहकारी नितीश राणाला म्हणत आहे की, “मला सकाळीपासूनच असे वाटत होते की, मी आज सामन्यामध्ये खूप जास्त धावा करणार आहे. तसेच मी या सामन्याचा सामनावीरही राहिल. त्यामुळे मी सामन्यापूर्वी स्वत:च हातावर लिहिले होते (Rinku Singh Wrote Massage On Palm)की, मी आज ५० धावा करेल.”
Said it. Did it. ????@rinkusingh235 #KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/3q3xgyoIOC
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
पुढे बोलताना रिंकूने म्हटले की, “अलीगडशी संबंध असणारे कित्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु आयपीएल खेळणारा मी पहिलाच खेळाडू आहे. आयपीएल इतर देशांतर्गत स्पर्धेंपेक्षा खूप वेगळा आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून या संधीची प्रतिक्षा करत होतो, परंतु मला सातत्याने संधी मिळत नव्हत्या. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत, ज्याच्या बळावर मला आयपीएलमध्येही चांगले प्रदर्शन करण्याचा विश्वास होता.”
रिंकू ठरला कोलकाताचा मॅच विनर
दरम्यान आयपीएल कारकिर्दीतील १३वा सामना खेळणारा रिंकू (Rinku Singh) जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा संघाने ९२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. सामना रोमांचक स्थितीत होता. अशात राजस्थानच्या गोलंदाजांचे सगळे डावपेच चुकीचे ठरवत रिंकूने २३ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा फटकावल्या. तसेच त्याने चौथ्या विकेटसाठी नितीश राणासोबत मिळून ६६ धावांची अभेद्य भागीदारीही रचली आणि संघाला ७ विकेट्स राखून सामना जिंकून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022 | असे ३ खेळाडू ज्यांना आयपीएल फ्रँचायझींनी केले होते रिटेन, पण विश्वासास ठरले अपात्र
श्रेयस अय्यरच्या विकेटवरून झाली कॉमेडी, पंचांनी दिला भलताच निर्णय; मग पडले तोंडघशी
‘तीन सामन्यातच धुमाकूळ घातला’, केकेआरचा कर्णधार श्रेयसने ‘या’ खेळाडूला म्हटले फ्यूचर स्टार