IND vs AFG 3rd T20I: रिंकू सिंगने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माला साथ देत भारताला 212 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. एकीकडे रोहित शर्माने नाबाद 121 धावांची खेळी खेळली, तर रिंकूने कर्णधाराला साथ दिली आणि 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 69 धावा केल्या. आता या सामन्यानंतर रिंकू सिंगने कर्णधार रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्याशिवाय भारताचे सर्व फलंदाज या सामन्यात फ्लॉप ठरले. अवघ्या 22 धावांवर भारताने 4 विकेट्स गमावल्या असताना दोघांनी ही भागीदारी केली.
सामन्यानंतर रिंकूने रोहित शर्मासोबत बॅटिंग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. कॅप्शनमध्ये त्याने लिहीले की, रोहित शर्मासोबतचा प्रत्येक क्षण त्याच्यासाठी शिकण्याचा मास्टरक्लास होता. “सामन्यामधील रोहित शर्मा भैय्यासोबतचा प्रत्येक क्षण हा शिकणे, मजा आणि करमणूक करण्यात मास्टरक्लास आहे. मालिका जिंकण्याचे वाइब्स.”
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी20 दोन सुपर ओव्हरनंतर संपला. या सामन्यात यजमान भारताने 212 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेही 212 धावा केल्या आणि सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हर झाली.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 16 धावा केल्या. त्यानंतर 17 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ 16 धावा करता आल्या आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली. यानंतर, दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 11 धावा फलकावर लावल्या आणि लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने अफगाणिस्तानला 1 धावेवर दोन फलंदाज बाद करून भारताला विजय मिळवून दिला. (Rinku Singh’s eye-catching statement about the captain after the win against Afghanistan)
हेही वाचा
IND vs AFG: रोहित-नबी यांच्या वादावर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘नबीने नियमानुसार…’
IND vs AFG: ‘सामना एक विक्रम अनेक’ बेंगलोर टी20 मध्ये बनले ‘हे’ मोठे विक्रम, जे मोडणे केवळ अशक्यच