भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मैदानावर त्याच्या विचित्र कृत्यांसाठी ओळखला जातो. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी (२८ ऑगस्ट) पंतने असेच काहीसे केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर पंत फलंदाजीला आला होता. मैदानावर उतरल्यानंतर त्याने नॉन स्ट्राईकरवर उभे राहून शॅडो फलंदाजीला सुरुवात केली. पंतला माहितच नव्हते की, जेम्स अँडरसन स्ट्राईकवर असलेल्या अजिंक्य रहाणेला गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अँडरसनने यष्टीपुढे उभा राहिलेल्या पंचांपर्यंत रनअप घेतल्यानंतर पंत पटकन आपल्या जागी वळला. त्याच्या या मजेशीर कृत्याला पाहून सर्वांनाच हसू फुटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Pant non-striker shadow batting #ENGvIND pic.twitter.com/hYGoBKg3zh
— Cat Jones has gone to Bluesky (@Cricketbatcat) August 28, 2021
रिषभ पंतने हेडिंग्ले कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फक्त 2 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याने 7 चेंडूत फक्त एक धाव केली होती. रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये एकेरी धावसंख्येवर बाद होण्याचा लज्जास्पद विक्रम देखील केला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावांमध्ये 25, 37, 22, 2 आणि 1 अशा धावा केल्या आहेत.
लीड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव करत मालिका बरोबरीत आणली आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 78 धावांवर बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात रोहित शर्माने 59 धावा केल्या, पुजाराने 91 धावा केल्या आणि कर्णधार विराट कोहलीने 55 धावा केल्या. पुजारा आणि कोहली बाद झाले आणि त्यानंतर संपुर्ण भारतीय फलंदाजी अक्षरशः कोलमडली. भारतीय संघाला पराभवाला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी तिसरी कसोटी एक डाव आणि 76 धावांनी गमावली आहे.
यासह भारत आणि इंग्लड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत पोहोचली आहे. आता दोन्ही देशांमधील पुढील कसोटी सामना 2 सप्टेंबरपासून द ओव्हल येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
तीन कसोटी सामने संपले, तरीही पंतला गवसेना सूर; कर्णधार कोहली म्हणाला…
‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल
भारताच्या ‘त्रिमूर्ती’लाही पुरुन उरला एकटा जो रूट, कामगिरी पाहून तुम्हीही कराल कौतुक