---Advertisement---

पंतच्या गर्लफ्रेंडने सुरु केले फॅशन स्टोअर; रिषभने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: शुक्रवार, जून 4, 2021 10:35 PM
---Advertisement---

आपल्या फलंदाजीने सर्व गोलंदाजांचा धुव्वा उडवणारा भारतीय युवा फलंदाज म्हणजे रिषभ पंत. पंत हा भारतीय संघाचा एक असा खेळाडू आहे, ज्याच्याकडे कोणत्याही क्षणी सामन्याचा नूर पालटण्याची क्षमता आहे . त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी परिचित असलेल्या रिषभ पंतने अल्पावधीतच जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख बनविली आहे. आज भारतीय चाहते रिषभ पंतशिवाय भारतीय संघाची कल्पना करू शकत नाहीत.

रिषभ पंत आपल्या खेळांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहतो. त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीसोबतची त्याची छायाचित्रे बर्‍याचदा चर्चेत असतात. पुन्हा एकदा अशाच कारणासाठी रिषभ पंत चर्चेत आला आहे.

ईशासाठी खास प्रतिक्रिया

रिषभ त्याच्या खेळाप्रमाणे त्याच्या भावना ही खुल्यापणे व्यक्त करतो. प्रत्येक सामन्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषद ते मुलाखतीमध्ये तो त्याच्या भावना दिलखुलासपणे भावना व्यक्त करतो. अशा परिस्थितीत तो आपल्या खास मैत्रिणीच्या नवीन कर्तृत्वाबद्दल कौतुक करण्यास कसा मागे राहू शकेल? रिषभ पंतने अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीला तिच्या नवीन फॅशन स्टोरबद्दल शुभेच्छा दिल्या. रिषभने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ईशाला दिल्या शुभेच्छा.

Screengrab: Instagram/@rishabhpant

ईशा नेगीने सुरु केले नवीन फॅशन स्टोर
ईशा नेगीने स्वतःचे फॅशन स्टोअर सुरू केले आहे. तिने त्याचे नाव ईशाज क्लोजेट ठेवले आहे. याद्वारे ईशा नेगी आणि तिची टीम त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या शैलीनुसार त्यांना कपडे निवडण्यास मदत करेल, तसेच वेगवेगळ्या प्रसंगी योग्य कपडे निवडण्यासाठी फॅशन सल्ला देतील.

रिषभ पंतच्या चाहत्यांना इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
वर्ष २०१८ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड दौर्‍या केला तेव्हा त्या कसोटी मालिकेत त्यांचा पराभव झाला होता, पण रिषभ पंतने इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकवून बरेच कौतुक मिळवले होते. त्यामुळे अगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय चाहत्यांना रिषभ पंतकडून खूप अपेक्षा आहेत. सध्या रिषभ इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासाठी पोहचला आहे. या दौऱ्यात भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

महत्वाच्या बातम्या

कमालच! सहा वर्षांचा चिमुकला चक्क धोनी स्टाइलमध्ये मारतो आहे हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडिओ

दक्षिण आफ्रिका सोडून इतर देशांकडून खेळलेल्या क्रिकेटपटूंची यादी, एक आहे विश्वविजेता खेळाडू

इंग्लंडला पोहोचताच स्मृती मंधानाच्या वेळापत्रकात होतो ‘हा’ महत्वाचा बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---