Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या पंतच करायचं काय? वारंवार संधी देऊनही करतोय निराश; न्यूझीलंडविरुद्ध झाला फ्लॉप

November 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी20  मालिकेतील दुसरा सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. भारतीय संघाकडून यष्टीरक्षक रिषभ पंतला सलामीवीर म्हणून प्राधान्य दिले गेले. मात्र, तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. सातत्याने संधी देऊनही मोठ्या धावा करण्यात अपयश येत असल्याने, आता चाहते थेट त्याच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहेत.

टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघासाठी रिषभ पंत व इशान किशन या यष्टीरक्षकांनी सलामी दिली. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला अपयश आल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी पंतला आता सलामीवीर म्हणून संधी देण्याची वेळ आल्याचे म्हटलेले. त्याची सुरुवात करत पंतने सलामी दिली. मात्र, त्याला पुन्हा एकदा अपयश आले. तो 13 चेंडूवर केवळ 6 धावा काढू शकला.

टी20 विश्वचषकात त्याला दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, या दोन्ही सामन्यात तो दुहेरी आकडा गाठू शकला नव्हता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो अडखळताना दिसत असल्याने चाहते त्याला ट्रोल करू लागले आहेत.

टी20 विश्वचषकात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू न शकल्याने भारतीय संघात आता बदल होण्याची शक्यता आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळले जाऊ शकते. सध्या मिळत असलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्या हा भारताचा पुढील टी20 कर्णधार असू शकतो.

(Rishabh Pant Again Flop Against Newzealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विनपाठोपाठ कार्तिकनेही घेतली द्रविडची बाजू; म्हणाला, ‘2023च्या वनडे विश्वचषकानंतर मला…..’
गिलने सांगितली रिषभ-उर्वशी वादाची सत्यता; म्हणाला, “तिलाच वाटते…”


Next Post
Rishabh-Pant

पंतची गाडी पळेना! 6 धावा करून बाद होताच बनला 'अशी' खराब कामगिरी करणारा भारताचा अव्वल फलंदाज

Hardik Pandya & Kane Williamson & Ishan Kishan

मैदानात उतरताच भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम, ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

Cricketer-Rishabh-Pant

रोहित- विराटच्या 'त्या' नकोशा विक्रमाच्या यादीत पंतही बसला मांडी घालून, बनला दुसराच खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143