भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. भारताचे पहिले तीन फलंदाज 34 धावांच्या स्कोरवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र त्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतनं एक टोक सांभाळून धरलं. पंतनं टीम इंडियासाठी 39 धावांची खेळी केली. त्यानं 52 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकार मारले. पंतच्या या खेळीदरम्यान एक तणावपूर्ण घटना घडली. त्याची बांगलादेशचा यष्टीरक्षक लिटन दासशी मैदानावरच बाचाबाची झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
या सामन्यात रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. भारताच्या डावाच्या 16व्या षटकात तो फलंदाजी करत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंतला एकेरी धाव घ्यायची होती. परंतु दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या यशस्वीनं त्याला नकार दिला. दरम्यान, गलीवरील क्षेत्ररक्षकानं फेकलेला चेंडू पंतच्या पॅडला लागला, ज्यामुळे तो संतापला. यावर पंत लिटन दासकडे पाहून म्हणाला, “त्याच्याकडे पाहा ना भाऊ, तो मला का मारतोय.” सुदैवान हे प्रकरण जास्त चिघळलं नाही.
Argument between liton das & rishabh pant.
Rishabh : “usko feko na bhai mujhe kyu mar rhe ho” pic.twitter.com/cozpFJmnX3
— PantMP4. (@indianspirit070) September 19, 2024
या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाची पहिली विकेट अवघ्या 14 धावांवर पडली. कर्णधार रोहित शर्मा 6 धावा करून बाद झाला. त्यानं 19 चेंडूंचा सामना केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलला खातंही उघडता आलं नाही. तो 8 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. विराट कोहली अवघ्या 6 धावा करून परतला.
चहापानापर्यंत भारतानं 6 गडी गमावून 176 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालं 56 धावा केल्या. तर बांगलादेशसाठी हसन मेहमूदनं 4 बळी घेतले.
हेही वाचा –
चेन्नई कसोटीच्या पहिल्याच सत्रात भारताचं कंबरडं मोडणारा हसन मेहमूद कोण आहे?
धोनीचा मोठा विक्रम आता धोक्यात, रिषभ पंतची वेगानं घोडदौड सुरु
चेन्नईत असं का केलं?, रोहितच्या या निर्णयानं चाहते हैराण!