रिषभ पंत आणि रोहित शर्मा बराच काळ भारतासाठी एकत्र खेळत आहेत. दोन्ही खेळाडू अनेकदा एकमेकांसोबत मजा करताना दिसतात. सोशल मीडिया असो किंवा खाजगी आयुष्यात, दोघेही एकमेकांचे पाय ओढत राहतात. दोन्ही खेळाडूंमध्ये अशीच एक गमतीदार घटना शारजाच्या मैदानावर घडली.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू नाणेफेक करताना एकत्र आले होते. याच दरम्यान हा गमतीदार प्रसंग घडला. मॅच रेफरीने नाणे वर उडवले आणि रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने मॅच रेफरीला त्याच्या निर्णयाची माहिती दिली, पण रोहितला याची माहिती नीट कळली नव्हती.
रोहितला वाटले की पंतने त्याच्या संघाला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले गेले आहे. जेव्हा रोहितने पंतला याबद्दल विचारले तेव्हा दिल्ली कर्णधाराने पुन्हा एकदा ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत’ असे म्हणत आपला निर्णय जाहीर केला आणि रोहित शर्मासह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
🚨 Toss Update from Sharjah 🚨@DelhiCapitals have elected to bowl against @mipaltan. #VIVOIPL #MIvDC
Follow the match 👉 https://t.co/Kqs548PStW pic.twitter.com/ERJAloH0vF
— IndianPremierLeague (@IPL) October 2, 2021
या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करू दिली नाही. मुंबईकडून या डावात सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईला दिल्ली संघाने अवघ्या १२९ धावांत रोखण्यात यश मिळवलं.
मुंबईने दिलेलं १३० धावांचं लक्ष्य दिल्लीच्या फलंदाजांनी चार गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून या सामन्यात श्रेयस अय्यरने चिवट फलंदाजी करत निर्णायक ३३ धावांची खेळी केली. त्याला आधी रिषभ पंतने २६ धावा करुन आणि रवीचंद्रन अश्विने २० धावा करुन चांगली साथ दिली.
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. कारण त्यांनी त्यांच्या ११ सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले होते आणि ते अजून प्लेऑफसाठी पात्र ठरलेले नव्हते. या पराभवानंतर त्यांचे प्लेऑफसाठी जाणे अवघड झाले आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलचा ‘थलैवा’! कधीही न मोडणारा विक्रम धोनीने केला आपल्या नावे
मैदानातून थेट दवाखान्यात! चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात ‘हा’ स्टार पाकिस्तानी क्रिकेटर जखमी
विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात यावी भारताच्या कर्णधारपदाची धूरा, डेल स्टेनचे मत