---Advertisement---

कार्तिकची उपस्थिती पंतसाठी धोक्याची? युवा यष्टीरक्षक म्हणाला, ‘प्रशिक्षक आणि कर्णधार…’

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 3:48 PM
Rishabh-Pant-Dinesh-karthik
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आशिया चषक खेळायचा आहे. २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. गतवर्षीच्या टी२० विश्वचषकातील कामगिरीवर पडदा टाकत भारतीय संघ आशिया चषकातून पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करेल. आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात यष्टीरक्षक रिषभ पंत याचाही समावेश असून त्याने दिनेश कार्तिकमुळे आपल्या स्थानाला असलेल्या धोक्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) १५ सदस्यांचा मजबूत संघ निवडला आहे. या संघात ३ यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश आहे. संघात रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिकव्यतिरिक्त (Dinesh Karthik) केएल राहुल आहेत. या तिघांपैकी राहुलचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. परंतु बऱ्याचशा क्रिकेट पंडितांचे म्हणणे आहे की, पंत आणि कार्तिक यांच्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये (Indian Team Playing Xi) जागा मिळवण्यासाठी शर्यत पाहायला मिळू शकते. कर्णधार रोहित शर्मासाठी पंत आणि कार्तिकपैकी एकाला अंतिम एकादशमध्ये निवडणे, मोठे आव्हान असणार आहे.

भारताने जूननंतर अधिकतर टी२० सामन्यांमध्ये कार्तिक आणि पंत या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या स्वदेशातील टी२० मालिकेत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या देशातील टी२० मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होते. पंत मधळ्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक व कार्तिक अनुभवी फिनिशरच्या रूपात भारताच्या टी२० संघाचा भाग होते.

मात्र आता आशिया चषकात हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांचे संघात पुनरागमन झाल्यानंतर संतुलन बनवण्यासाठी पंत किंवा कार्तिकपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. एका टीव्ही चॅनेलद्वारे यासंदर्भात प्रश्न विचारला गेला असता पंत म्हणाला की, “आम्ही कधीही अशाप्रकारे विचार करत नाही. आम्ही वैयक्तिकपणे नेहमी आमचे १०० टक्के देण्याच्या प्रयत्नात असतो. बाकी प्रशिक्षक आणि कर्णधारावर अवलंबून असते की, कोणत्या निर्णयाचा संघाला कसा फायदा करून देता येईल.” 

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

शॉकिंग! मुंबई इंडियन्सच्या संघ मालकाला पुढील ३ तासांत संपवण्याची धमकी

बाबाचं दिडशतक प्रत्यक्षात पाहुन लेकीचा आनंद गगनात मावेना! पुजाराच्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल

केएल राहुलमुळे विंडीजच्या दौऱ्यात भन्नाट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूचा फलंदाजी क्रम धोक्यात!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---