भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात शुक्रवारी (१७ जून) राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर चौथा टी२० सामना होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी करा अथवा मरा सामना असणार आहे. कारण दक्षिण आफ्रिका संघाने सुरुवातीचे सलग २ सामने जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अशात जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तर भारतीय संघ ही मालिका गमावेल. याउलट जर सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागला, तर मालिकेत २-२ असी बरोबरी होईल. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंकडे काही विक्रम बनवण्याची संधी असेल.
भारतीय संघाचा फिरकीपटू अक्षर पटेलकडे (Axar Patel) या सामन्यात विकेट्सचे शतक पूर्ण (Axar Patel 100 International Wickets) करण्याची संधी असेल. जर अक्षरने या सामन्यात एकही विकेट घेतली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या १०० विकेट्स पूर्ण करेल. अक्षरने आतापर्यंत ६८ वनडे सामने खेळताना ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ६ कसोटीत ३९ आणि १८ टी२०त १५ विकेट्स घेतल्या आहेत.
अक्षरबरोबरच वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याकडेही मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याती संधी असेल. जर भुवनेश्वरने (Bhuvneshwar Kumar) या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या, तर तो टी२० क्रिकेटमधील भारताचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनेल. भुवनेश्वरच्या खात्यात सध्या ६२ टी२० सामन्यात ६४ विकेट्सची नोंद आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. जर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात ४ विकेट्स घेतल्या तर ६८ विकेट्ससह तो दुसऱ्या क्रमांकावरील जसप्रीत बुमराहला मागे टाकत दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत याच्याकडेही षटकारांचे शतक पूर्ण करण्याची संधी असेल. जर पंतने (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात (Second T20I) एक जरी षटकार मारला तर, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले १०० षटकार (Hundred International Sixes) पूर्ण करेल.
पंतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९९ षटकार ठोकले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३० सामने खेळताना ५१ डावांमध्ये फलंदाजी करत ४४ षटकार मारले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याला जास्त संधी मिळालेली नाही. त्याने २४ वनडे सामन्यातील २२ डावांमध्ये फलंदाजी करताना २४ षटकार मारले आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये ४४ सामन्यांमधील ३८ डावांमध्ये फलंदाजी करताना ३१ षटकार ठोकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळीची ताकदच आता टीम इंडियाची बनली डोकेदुखी!
कशी नशीबानं थट्टा आज मांडली! आयर्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी ‘या’ पाच खेळाडूंना केले दुर्लक्षित
दुखापत की अजून काही? भारताच्या पहिल्या तुकडीसह रोहित का गेला नाही इंग्लंडला? घ्या जाणून