भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पुणे येथे सुरुवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करुन इंग्लंडसमोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले. युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने एका खास यादीत दुसरे स्थान पटकावले.
पंतचे तुफानी अर्धशतक
कसोटी व टी२० मालिका गाजवल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यात जखमी श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतला संधी मिळाली. तो जवळपास १४ महिन्यानंतर वनडे संघात पुनरागमन करत होता. त्याने हे पुनरागमन दणक्यात साजरे करत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूत ७७ धावांची तुफानी खेळी केली. ज्यामध्ये ३ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता. त्याने केएल राहुलसोबत चौथ्या गड्यासाठी ११३ धावांची आक्रमक भागीदारी केली.
या यादीत आला दुसऱ्या स्थानी
रिषभने आपल्या ७७ धावांच्या खेळीदरम्यान ७ उत्तुंग षटकार लगावले. यासोबतच तो एका वनडे सामन्यात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांमध्ये दुसऱ्या स्थानी आला. भारतासाठी एका वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावे आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावांच्या खेळीत दरम्यान १० षटकार मारले होते.
या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानीदेखील धोनीचा हे त्याने या दोन्ही वेळी प्रत्येकी सहा षटकार ठोकले होते. तसेच, केएल राहुलने देखील मागील वर्षी न्यूझीलंड विरुद्ध यष्टिरक्षक म्हणून खेळताना आपल्या शतकी खेळीदरम्यान ६ षटकार लावले होते.
भारताची मोठी धावसंख्या
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर लवकर परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली व केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. राहुलने दमदार शतक ठोकत भारताच्या डावाचे नेतृत्व केले. विराटव्यतिरिक्त रिषभ पंतने आक्रमक अर्धशतक (७७) झळकावत ठोकले. अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने १६ चेंडूत ३५ धावांचा तडाखा दिला. इंग्लंडसाठी रिस टोप्ली व टॉम करन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडचा विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तीच धावसंख्या तोच फलंदाज! आजवर एक-दोन नव्हे ‘इतक्यांदा’ विराट वनडेत झालाय ६६ धावांवर बाद
राहुलने कोहलीला टाकले मागे, ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज
ना विराट ना रोहित; कोणत्याही सक्रिय भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम राहुलच्या नावावर