सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात आज(4 जानेवारी) दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 24 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला आहे.
या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक केले आहे. त्याने हे शतक 137 चेंडूत पूर्ण केले. पंतने या सामन्यात 189 चेंडूत नाबाद 159 धावा केल्या आहेत. यात खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीत शतक करणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज आहे. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी शतक करता आले नव्हते.
विशेष म्हणजे पंतने इंग्लंड विरुद्धही कसोटीत शतक केले आहे. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये कसोटी शतक करणाराही पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–शतक केले पुजारा-पंतने, विक्रम झाला टीम इंडियाच्या नावावर
–धोनी एवढ क्रिकेट खेळला, परंतु हा विक्रम कधी करताच आला नाही
–का होतेय सध्या रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची तुलना