अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेला पहिला कसोटी सामना भारताने 31 धावांनी जिंकला आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतसाठीही खास ठरला आहे.
त्याने या सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो 11 झेल घेणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याचबरोबर एका कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाशीही त्याने बरोबरी केली आहे.
एका कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याचा पराक्रम याआधी जॅक रसेल आणि एबी डेविलियर्स यांनी केला आहे. त्यामुळे आता पंतनेही त्यांच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.
त्यांच्या पाठोपाठ या यादीत प्रत्येकी 10 झेलांसह बॉब टेलर, अॅडम गिलख्रिस्ट आणि वृद्धिमान साहा हे तीन यष्टीरक्षक आहेत.
तसेच पंत हा यष्टीरक्षक म्हणून एका कसोटी सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारा जगातील 6 वा यष्टीरक्षक ठरला आहे.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक:
11 – जॅक रसेल, एबी डेविलियर्स आणि रिषभ पंत
10 – बॉब टेलर, अॅडम गिलख्रिस्ट, वृद्धिमान साहा #म #मराठी @Maha_Sports— Pranali Kodre (@Pranali_k18) December 10, 2018
त्याचबरोबर एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतही पंत अव्वल क्रमांकावर असून साहा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. साहाने यष्टीरक्षक म्हणून याचवर्षी केपटाउन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच कसोटी सामन्यात 10 झेल घेण्याची कामगिरी केली होती.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नयन मुंगीया आणि एमएस धोनी आहेत. यांनी एका कसोटी सामन्यात 8 झेल घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच मुंगीयाने अशी कामगिरी 1996 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे आणि 1999 ला कोलकतामध्ये पाकिस्तान विरुद्ध असे दोन वेळा केली आहे. तर धोनीने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 2014 मध्ये मेलबर्न कसोटीत 8 झेल घेतले होते.
एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल घेणारे भारतीय यष्टीरक्षक-
11 – रिषभ पंत (2018, अॅडलेड)
10 – वृद्धिमान साहा (2018, केपटाउन)
8 – नयन मुंगीया (1996, डर्बन)
8 – नयन मुंगीया (1999, कोलकता)
8 – एमएस धोनी (2014, मेलबर्न)#म #मराठी @Maha_Sports
— Pranali Kodre (@Pranali_k18) December 10, 2018
याबरोबरच या 11 झेलांसह पंत हा यष्टीमागे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर यष्टीमागील 10 झेलांसह साहा आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर यष्टीमागील 9 विकेटसह एमएस धोनी आहे. त्याने 2014च्या मेलबर्न कसोटीत 8 झेल आणि 1 यष्टीचीत केले होते.
पंतने या सामन्यात पहिल्या डावात 6 झेल घेतले होते. त्यामुळे त्याने कसोटी सामन्यातील एका डावात यष्टीरक्षक म्हणून 6 झेल घेण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
धोनीने 2009 ला वेलिंग्टन येथे न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 6 झेल घेण्याचा पराक्रम केला होता.
यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय यष्टीरक्षक –
11 – रिषभ पंत (सर्व झेल)
10 – वृद्धिमान साहा (सर्व झेल)
9 – एमएस धोनी (8 झेल, 1 यष्टीचीत)
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे चेतेश्वर पुजारा आहे टीम इंडियासाठी लकी
–अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास
–जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!