गयाना। भारतीय संघाने मंगळवारी(6 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध प्रोविडन्स स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली.
भारताच्या या विजयात विराट कोहलीने 45 चेंडूत 59 धावांची आणि रिषभ पंतने 42 चेंडूत नाबाद 65 धावांची अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या अर्धशतकाबरोबरच रिषभ पंतने खास पराक्रम केला आहे.
तो वयाची 22 वर्षे पूर्ण करण्याआधी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन अर्धशतके करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रिषभने मंगळवारी हे अर्धशतक केले तेव्हा त्याचे वय 21 वर्षे 306 दिवस होते.
याआधी वयाची 22 वर्षे पूर्ण करण्याआधी रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये प्रत्येकी 1 अर्धशतक केले होते.
रिषभने मंगळवारच्या सामन्याआधी मागीलवर्षी चेन्नईमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 58 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
वयाची 22 वर्षे पूर्ण करण्याआधी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय क्रिकेटपटू-
2 अर्धशतके – रिषभ पंत
1 अर्धशतक – रोहित शर्मा
1 अर्धशतक – रॉबिन उथप्पा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनी, रोहित पाठोपाठ कर्णधार कोहलीनेही केला हा खास पराक्रम
–दोन दिवसापूर्वीच रोहित शर्माने केलेल्या विश्वविक्रमाची किंग कोहलीने केली बरोबरी
–स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत घेतली मोठी झेप; विराटचे अव्वल स्थान धोक्यात