---Advertisement---

स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत घेतली मोठी झेप; विराटचे अव्वल स्थान धोक्यात

On: बुधवार, ऑगस्ट 7, 2019 6:00 AM
---Advertisement---

सोमवारी(5 ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या ऍशेस सामन्यात 251 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे पुजारा आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर 1 वर्षांच्या बंदीचा कालावधी पूर्ण करत स्मिथने पहिल्या ऍशेस सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. या सामन्यात त्याने दोन्ही डावात अनुक्रमे 144 आणि 142 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

तसेच त्याच्या या कामगिरीमुळे त्याला कसोटी क्रमवारीतही फायदा झाला आहे. तो आता 903 गुणांसह फलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच या क्रमवारीत 922 गुणांसह भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.

याबरोबर पहिल्या ऍशेस सामन्यात दोन्ही डावात मिळून 9 विकेट्स घेणारा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथम लायनने गोलंदाजी क्रमवारीत 6 स्थानांची मोठी झेप घेताना 13 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्स अव्वल स्थानावर कायम आहे. त्याने या सामन्यात 7 विकेट्स घेतल्या.

तसेच इंग्लंडचे बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स हे फलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे 69 आणि 70 व्या क्रमांकावर आले आहेत. तसेच इंग्लंडकडून पहिल्या डावात 133 धावांची शतकी खेळी करणारा रॉरी बर्न्सने 25 स्थानांची प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम 81 वे स्थान मिळवले आहे.

त्याचबरोबर या सामन्यातून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100 कसोटी विकेट्स पूर्ण करणाऱ्या वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने 2 स्थान पुढे जात गोलंदाजी क्रमवारीत 16 वे स्थान मिळवले आहे. तसेच या सामन्यात 4 विकेट्स घेणाऱ्या वोक्सने 4 क्रमांकाची प्रगती करत 29 वे स्थान मिळवले आहे.

याबरोबरच वोक्सने अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत मोईन अलीला मागे टाकत 9 वे स्थान मिळवले आहे. अली अष्टपैलू क्रमवारीत 10 व्या स्थानावर घसरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–मैदानात पाऊल टाकताच राहुल चाहरचा झाला या खास यादीत समावेश

–तिसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया; रोहित, जडेजाला विश्रांती

–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment