---Advertisement---

भाईचा बड्डे, मग सेलिब्रेशन फाडू असणारचं! रिषभच्या बड्डेदिनी दिल्लीच्या ताफ्यात ‘केकची होळी’, तुम्हीही पाहा

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 4:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याने सोमवारी (४ ऑक्टोबर) आपला २४ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बऱ्याच आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभूत करत त्याला वाढदिवसाची भेटही दिली होती. या विजयानंतर संघाच्या हॉटेलमध्येही त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

वाढदिवसाच्या दिवशी चेन्नई सुपर किंग्ससारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणे, यापेक्षा आणखी मोठी भेट असूच शकत नाही. त्यामुळे सामना झाल्यानंतर जेव्हा संघ हॉटेलमध्ये परतला. त्यावेळी संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला आणि कर्णधार रिषभ पंतचा वाढदिवस देखील साजरा केला .

त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रिषभ पंत आणि अक्षर पटेल एकत्र केक कापताना दिसून येत आहेत. कारण रिषभ पंतचा वाढदिवस होता आणि अक्षर पटेलने चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर जेव्हा केक कापला, त्यावेळी संघातील इतर खेळाडूंनी रिषभ पंतच्या चेहऱ्यावर केक लावला. तर रिषभ पंतने देखील संघातील इतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर केक लावला. एकंदरित खेळाडूंनी केकने होळी खेळली असल्याचे या व्हिडिओत दिसते आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षर पटेल, रिषभ पंत, मोहम्मद कैफ, कागिसो रबाडा, अमित मिश्रा आणि संघातील इतर खेळाडू मस्ती करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओवर कॅप्शन म्हणून त्यांनी, “रिषभ पंतचा वाढदिवस आणि सामन्यानंतर केलेले सेलिब्रेशन” असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/tv/CUpwtW2KF8X/?utm_medium=copy_link

पंतच्या वाढदिवसा दिवशी चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, अंबाती रायुडूने नाबाद ५५ धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने १९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटकअखेर ५ बाद १३६ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने ३९ धावांची खेळी केली. तर, शिमरोन हेटमायरने नाबाद २८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘फॉर्मात नसले तर काय झालं, खेळाडूंवर विश्वास दाखवा, मग पाहा’, टी२० विश्वचषकापूर्वी दिग्गजाचा मोलाचा सल्ला

इशानने सॉलिड षटकार ठोकत जिंकवला सामना, आनंदात हार्दिकचे डोक्यावर चुंबन; व्हिडिओ तुफान व्हायरल

पप्पाची परी! सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या फाफला मुलीने शिट्टी वाजवत केले चीयर, पाहा क्यूट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---