दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२७ धावा केल्या. तर प्रत्युत्तर देत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १९७ धावांमध्ये माघारी परतला आहे. दरम्यान या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२८ डिसेंबर) भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतने एक मोठा पराक्रम करत एमएस धोनीचा विक्रम मोडून काढला आहे.( India tour of South Africa)
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या ८ धावा करता आल्या. तो फलंदाजीत फ्लॉप ठरला असला तरीदेखील, यष्टिमागे त्याने मोठा कारनामा केला आहे. तो यष्टिरक्षक म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. या बाबतीत त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. हा कारनामा त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केला आहे.(Rushabh pant breaks the record of Ms Dhoni)
रिषभ पंतने दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू असताना, पहिल्या डावात टेंबा बावुमाचा झेल टिपताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने हा कारनामा अवघ्या २६ व्या कसोटी सामन्यात केला आहे. तर एमएस धोनीने हा कारनामा ३६ व्या कसोटी सामन्यात केला होता.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने हा कारनामा अवघ्या २२ व्या सामन्यात केला होता. या कामगिरीसह रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा ६ वा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे. त्याच्याआधी एमएस धोनी, सय्यद किरमाणी, किरण मोरे, नयन मोंगिया आणि वृद्धिमान साहा यांनी हे शतक पूर्ण करण्याचा कारनामा केला आहे. एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी यष्टिरक्षक आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये २९४ बळींची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या :
”स्टोक्समध्ये ती बात राहिली नाही”; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने उडविली खिल्ली
विश्वचषक आणि ऍशेस जिंकवूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया हटविणार कोच लँगरला? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा :