---Advertisement---

“अय्यरच्या अनुपस्थितीत पंतच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची सूत्रे द्या, तो संघाला चॅम्पियन बनवेल”

On: मंगळवार, मार्च 30, 2021 6:06 PM
---Advertisement---

इंग्लंडचा भारत दौरा संपला असून खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 ची जोरदार तयारी सुरू केली आहे. या मालिकेत सहभागी झालेले भारतीय खेळाडू आणि आयपीएलसाठी वेगवेगळ्या संघात असलेले इंग्लंडचे खेळाडू आपापल्या संघांत सामील झाले आहेत. रोहित शर्माही मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाचे बहुतेक खेळाडू देखील क्वारंटाईन झाले आहेत.

आयपीएल २०२१ मधून श्रेयस अय्यर बाहेर पडल्यापासून दिल्ली संघाने अद्यापही त्यांच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत सध्या कर्णधार पदासाठी रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, स्टिव्ह स्मिथ आणि शिखर धवन यांची नावे येत आहेत.

दरम्यान भारतीय कसोटी संघाचे माजी सलामीवीर आणि समलोचक आकाश चोप्रा यांनी रिषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिटलचे कर्णधारपद सोपविण्याची मागणी केली आहे. रिषभ सध्या ज्या प्रकारे खेळत आहे त्यावरून त्यांना असे वाटते की दिल्लीच्या संघाला तो अंतिम फेरीतच नक्कीच पोहोचवू शकतो.

आकाश चोप्रा यांना एका चाहत्याने विचारले की, “तुम्हाला असे वाटते का, रविचंद्रन अश्विन हा दिल्लीचा कॅपिटलचा कर्णधार म्हणून एक चांगला पर्याय आहे. कारण त्याने एका हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवले होते, पण तो या मोसमातील सर्व सामने खेळू शकेल का?”

यावर आकाश चोप्रा म्हणाले, “तो सुद्धा एक पर्याय आहे. तसेच श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंत आहे, शिखर धवन आहे, अजिंक्य रहाणे आहे, स्टीव्ह स्मिथ देखील आहे. असे बरेच पर्याय आहेत. पण यामध्ये मी पंतच्या दिशेने जाऊ इच्छितो. कारण जर तुम्ही पाहिले तर अश्विन मागच्या हंगामात थोडा तंदुरुस्तीबाबत अडचणीत होता. त्याने काही सामने गमावले होते, म्हणून आपण जे संपूर्ण हंगामात संघात उपलब्ध राहणार आहे त्याच्यासोबत जाऊ. दुसरे म्हणजे रिषभ पंत ज्या चतुराईने खेळत आहे. तसेच ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहून दिल्ली संघासाठी भाग्यवान ठरू शकतो.”

तसेच ते म्हणाले की, “मला असे वाटते की कधीकधी ग्रह फिरतात. त्यामुळे कदाचित कर्णधार बनून त्याची कामगिरी चांगली होऊन दिल्ली कॅपिटल फक्त अंतिम फेरी गाठेलच असे नाही, तर त्यात विजयही मिळवेल. अश्विन आणि पंतमध्ये मी पंतचीच निवड करीन. कारण अश्विनच्या आधी मी शिखर धवनकडे जाईन. कारण तो सुध्दा संघाचा एक वरिष्ठ खेळाडू आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

यंदा पंजाब किंग्जचं बदलणार नशीब! ‘हा’ धुरंधर नेटमध्ये मारतोय गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

आठवतंय का? आजच्याच दिवशी पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत टीम इंडियाने गाठली होती विश्वचषकची फायनल

अर्जुनला मिळणार मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पणाची संधी? पाहा काय सांगतायंत ‘हे’ फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---