डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. मात्र आता तो मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं ऋषभला तंदुरुस्त घोषित केलं आहे. तो आगामी आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीबीसीआयनं ऋषभ पंतवर एक सीरीज बनवली आहे. ‘मिरॅकल मॅन’ असं या सीरीजचं नाव आहे. त्याचा ट्रेलर नुकताच शेअर करण्यात आला. या मालिकेचा पहिला भाग गुरुवारी (14 मार्च) रिलीज होणार असल्याचं बोर्डानं सांगितलं.
ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला होता. यानंतर तो बराच काळ रुग्णालयात दाखल होता. यानंतर त्यानं पुनरागमन करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खूप मेहनत घेतली. पंत आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनामागील मेहनतीवर बीसीसीआयनं एक सीरीज बनवली आहे. बोर्डानं आज ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला. हा या सीरीजचा ट्रेलर आहे. सीरीजचा पहिला भाग 14 मार्चला सकाळी 9 वाजता रिलीज केला जाईल.
बीसीसीआयनं पंतच्या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “ही कथा प्रेरणा, प्रबळ इच्छाशक्ती आणि फोकसबद्दल आहे. ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. कार अपघातानंतर त्यानं पुनरागमन केलं आहे.” व्हिडिओमध्ये ऋषभ म्हणाला की, “मला आता बऱ्याच अंशी चांगलं वाटत आहे.”
या सीरीजमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिजिओथेरपिस्ट धनंजय कौशिक यांनी ऋषभ पंतच्या दुखापतीबद्दल सांगितलं आहे. त्यांनी पंतच्या पुनरागमनावर प्रतिक्रिया दिली. यासोबतच मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिनशॉ परडीवाला यांनीही ऋषभच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. अपघातामुळे तो मागचं सीजन खेळू शकला नव्हता. त्यावेळी तो संघाचा कर्णधार होता. त्याच्या अनुपस्थिती डेव्हिड वॉर्नरनं टीमची धुरा सांभाळली. आता पुनरागमनानंतर पंत पुन्हा एकदा कर्णधार बनेल की वॉर्नरच संघाचं नेतृत्व करेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
रमजानचा उपवास सोडण्यासाठी क्रिकेट मॅच थांबवली, खेळाडूंनी मैदानावरच खाल्ला खजूर