भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मागील वर्षीच्या अखेरीस भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याने 16 जानेवारी रोजी अपघातानंतर पहिल्यांदा ट्वीट करत सर्वांना त्याच्या आरोग्यावषयी माहिती दिली. यासोबतच त्याने पोस्ट शेअर करत त्याचा जीव वाचवणाऱ्या दोन व्यक्तींनाही धन्यवाद दिला. यानंतर आता रिषभ पंतसाठी एमएसके प्रसाद यांनी भावूक वक्तव्य केले आहे.
खरं तर, 30 डिसेंबर, 2022 रोजी पहाटे 5.30च्या आसपास रिषभ पंत (Rishabh Pant) त्याच्या घरी एकटाच कार चालवून जात होता. त्यादरम्यान रुडकी महामार्गाजवळ त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर त्याच्या गुडघ्यावर लिगामेंट सर्जरीदेखील झाली. आता रिषभ पंतविषयी एमएसके प्रसाद (MSK Prasad On Rishabh Pant) यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
भारतीय संघाचे माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचे मन जिंकणारे वक्तव्य
रिषभ पंत याच्याविषयी एमएसके प्रसाद यांनी भावूक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “मला रिषभ पंत याच्यासाठी खूप दु:ख होत आहे. असे वाटत आहे की, जसे माझ्याच मुलाला काहीतरी झाले आहे. हे वेदनादायी वाटते. कारण, आम्ही 19 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी पाहिली. त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यासोबत राहिलो.”
पुढे बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, “आम्ही त्याला डोळ्यांपुढे मोठे होताना पाहिले आहे. त्या भयानक दुर्घटनेकडे पाहणे हे फक्त त्याच्या कुटुंबासाठी नाही, तर त्या सर्व कुटुंबातील लोकांसाठी वेदनादायी आहे, ज्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच, जे त्याच्यासोबत राहिले आहेत.”
विशेष म्हणजे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पुढील फेब्रुवारी महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने सध्या पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. खरं तर, या दोन्ही मालिकेसाठी पंत अनुपस्थित असेल. अशात त्याच्या जागी ईशान किशन याला कसोटी संघात निवडले आहे. याव्यतिरिक्त केएस भरत हादेखील भारतीय संघाचा भाग आहे. (rishabh pant car accident msk prasad s emotional statement read what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गेम ऑन! वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहितने नेट्समध्ये गाळला घाम, व्हिडिओत दिसले जबरदस्त फटके
न्यूझीलंडविरुद्ध ईशान खेळणार! रोहितने केले शिक्कामोर्तब, मात्र जबाबदारी असणार वेगळी