दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा (Second Test) दुसरा दिवस (०४ जानेवारी) रोमांचक राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे विशेष कामगिरी करू शकले नाहीत. परिणामी भारताचा संघ फक्त २०२ धावांवरच सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनाही खास खेळी करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने ७ विकेट्स घेत त्यांचा डाव २२९ धावांवर रोखला. यासह यजमानांकडे नाममात्र २७ धावांची आघाडी आहे.
या डावादरम्यान यष्टीमागे उभा असलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कृतीमुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
त्याचे झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना पंतने यष्टीमागे असा झेल घेतला आहे, ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे(Rishabh Pant Catch Controversy). लंच ब्रेकच्या पूर्वी शार्दुलच्या गोलंदाजीवर रासी वॅन डर डूसेन (Rassie Van Der Dussen) १७ चेंडू खेळून एका खराब फटक्यामुळे यष्टीरक्षक पंतच्या हाती झेल देऊन बसला. पंतनेही संधीचे सोने साधत झेल टिपत संघाला चौथी विकेट मिळवून दिली. मैदानी पंचांनीही डूसेनला झेलबाद दिले आणि लंच ब्रेक झाला.
लंच ब्रेकदरम्यान त्या झेलचा रिप्ले दाखवला गेला, ज्यामध्ये चेंडू पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये जाण्यापूर्वी त्याने जमिनीवर हलकासा टप्पा घेतला असल्याचे दिसत होते. परंतु पूर्वी फलंदाज डूसेनने रिव्ह्यूसाठी अपील केली नव्हती आणि मैदानी पंचांनाही हा झेल योग्य असल्याचे वाटल्याने त्यांनीही आपला निर्णय दिला होता. परंतु रिप्लेमध्ये झेलबद्दल संशय निर्माण झाल्याने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आला. परंतु अशावेळी क्रिकेट नियमांनुसार मैदानी पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असतो. त्यामुळे तिसरे पंचही मैदानी पंचांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि डूसेनला झेलबाद दिले गेले.
— Bleh (@rishabh2209420) January 4, 2022
परंतु पंतचा डूसेनचा झेल टिपतानाचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने क्रिकेटरसिकांनी यावर प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी चेंडू पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये जाण्यापूर्वी तो जमिनीवर टप्पा घेतला असल्याचे म्हटले आहे. यावरून सोशल मीडियावर विवाद पेटताना दिसतो आहे.
अगदी भारताचे माजी दिग्गज सुनिल गावसकर यांनीही या झेलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर फलंदाजाला या झेलबाबत थोडीसी जरी शंका होती, तर मग तो थांबला का नाही?. त्याने यासाठी पंचांकडे अपील का केली नाही?, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता
VIDEO! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खराब रिव्ह्यू! तुम्हालाही आवरणार नाही हसू
नेटकऱ्यांनी दिला रहाणेला ‘फेअरवेल’; सोशल मीडियावर व्हायरल होतायेत भन्नाट मीम्स
हेही पाहा-