मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या 7 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. हा सामना रीषभ पंतसाठी विशेष होता. कारण तो बर्याच दिवसांनी आपला आदर्श एमएस धोनीला भेटत होता. सामन्याआधी रीषभ पंतने एमएस धोनीची भेट घेतली आणि त्यांच्याशी विनोदही केला. धोनीचे दंड पाहून रीषभ पंतही खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या दंडावर हात ठेवून काहीतरी सांगितले. पंतचा एमएस धोनीच्या दंडाला हात लावतानाचा फोटो त्वरित सोशल मीडियावर व्हायरल झाला.
https://twitter.com/Kolkata_MSD_FC/status/1309500883814629376
पंतला धोनीचे मजबूत दंड पाहून आश्चर्य वाटले आणि म्हणूनच त्याने त्याच्या दंडावर हात ठेवून त्यांच्याशी चर्चा केली. धोनीने पंतलाही प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर ते आपल्या संघांच्या डगआऊटमध्ये गेल्याचे या फोटोंमधून स्पष्ट होत आहे. पंतच नव्हे तर अनेकजण धोनीचे मसल्स पाहून दंग झाले आहेत. आयपीएल 2020 च्या पहिल्या सामन्यात धोनी नाणेफेकवेळी आला होता, तेव्हा त्याची भारदार शरीरयष्टी पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. समालोचक मुरली कार्तिक यांनीही धोनीला त्यांच्या मसल्सचे रहस्य विचारले.

लॉकडाऊन दरम्यान त्याने जिममध्ये बराच वेळ घालवला असल्याचे धोनीने सांगितले होते. धोनी म्हणाला की, “त्याला जास्त कार्डिओ करता आले नाही. परंतु त्याने बरेच वेट ट्रेनिंग घेतले. जेव्हापासून धोनीने आयपीएलमध्ये पाऊल टाकले आहे, तेव्हापासून त्याच्या मसल्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
धोनीची तंदुरुस्ती जबरदस्त आहे
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला असला तरी त्याची तंदुरुस्ती अजूनही अप्रतिम आहे. अनेक युवा क्रिकेटर्सपेक्षा धोनी वेगात धावतो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने आपल्या वेगाचा नमुनादेखील सादर केला. पियुष चावलाच्या चेंडूवर अंत्यत चपळाईने धोनीने पृथ्वी शॉला यष्टिचीत केले. तसेच श्रेयस अय्यरचा हवेत उडी मारत उत्तम झेल देखील घेतला.






