सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने पहिल्या डावात नाबाद 159 धावांची खेळी केली आहे.
तो याआधी कसोटीमध्ये दोन वेळा ‘नर्वस नाइंटी’चा शिकार झाला होता. तो विंडीज विरुद्ध झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यात 92 धावांवर बाद झाला होता. पण यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शानदार दिडशतकी खेळी केली. पण ही दिडशतकी तो रविंद्र जडेजामुळे करु शकला असे त्याने सांगितले आहे.
या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर(4 जानेवारी) जेव्हा पंतला विचारण्यात आले की तो सतत मागील काही सामन्यात स्वस्तात बाद होता, पण या सामन्यात काय बदल केला.
त्यावेळी पंतने सांगितले की ‘मला वाटत नाही की मी काही बदलले आहे. खरंतर यावेळी माझ्या दुसऱ्या बाजूला एक फलंदाजच(जडेजा) होता. बऱ्याचदा असे होते की मी जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा माझ्याबरोबर तळातले फलंदाज असतात. त्यामुळे मला वेगळा विचार करुन खेळावे लागते.’
‘पण जेव्हा तूम्ही एखाद्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करता तेव्हा वेगळी गोष्ट असते. जे तूम्ही पाहिले.’
त्याचबरोबर स्वत:चा खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य संघ व्यवस्थापनाने त्याला दिले असल्याचेही पंतने सांगितले, तो म्हणाला, ‘माझ्या फलंदाजीतीस सर्वोत्तम भाग म्हणजे मला संघातील सर्वांनीच माझा खेळ करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मी जेव्हाही फलंदाजीला जातो तेव्हा मी खेळाची मजा घेतो. ही गोष्ट मला आवडते.’
त्याचबरोबर पंतने तो जेव्हा 92 धावांवर दोन वेळा बाद झाला तेव्हा नाराज असल्याचेही सांगितले आहे.
तसेच तो म्हणाला ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक शतक माझ्यासाठी खास आहे. मी नुकतीच माझी कारकिर्द सुरु केली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी शतकाचा जास्त विचार करत नाही. मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, तो म्हणजे संघाला माझ्याकडून काय हवे आहे. हे एकच माझे ध्येय असते.’
महत्त्वाच्या बातम्या:
–रिषभ पंतच्या त्या विक्रमाची चर्चा आजही देशात सुरुच
–म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सिडनी कसोटीदरम्यान पिंक कॅप दिल्या ग्लेन मॅकग्राला
–केएल राहुलचे मैदानातील ते कृत्य पाहून अंपायरलाही करावे लागले कौतुक, पहा व्हिडिओ