---Advertisement---

पंतचा कमाल स्टंट; WTC फायनल गाजवण्यासाठी रिषभ ‘असा’ करतोय मेहनत

On: गुरूवार, मे 27, 2021 6:46 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत मागील काही दिवसांपासून आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी चर्चेत आहे. मागील ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध अतुलनीय कामगिरी करत त्याने कसोटी संघात आपले स्थान निश्चित केले आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी पंतची देखील निवड झाली आहे. इंग्लंडमध्ये भारताला 18 जूनपासून न्यूझीलंडच्या विरोधात आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. मुंबईच्या हॉटेलमध्ये सर्व खेळाडूंचा सराव चालू आहे. त्याच दरम्यान सराव करताना रिषभ पंतने एक खतरनाक स्टंट केल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पंत सरळ उभा राहून हळूहळू मागच्या बाजूला शरीर झुकवून दोन्ही हात जमिनीवर टेकवतो. त्यानंतर जबरदस्त स्टंट मारत उभा राहतो. हा व्हिडिओ शेअर करत पंतने लिहिले की, “काहीवेळा जग तुम्हाला उलट सुलट दिसू शकेल. परंतु नेहमी आपल्या नजरेसमोर आपले ध्येय असायला पाहिजे.”

पंतव्यतिरिक्त मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, मयंक अगरवाल, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, उमेश यादव हे ते खेळाडू आहेत, जे मुंबईच्या हॉटेलमध्ये विलगीकरणात असून जिममध्ये सराव करत आहेत.

विराट कोहलीसह मुंबईमधूनचं जे खेळाडू उशीरा भारतीय संघासोबत जोडले गेले आहेत, त्यांनी सध्यातरी जिममध्ये सरावास सुरुवात केलेली नाही. परंतु ते आपापल्या खोलीत सराव करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हॉटेलच्या खोलीमध्ये भारतीय खेळाडूंना लागणारे सर्व साहित्य पुरवले जात आहेत. त्यामुळे ते सराव करू शकत आहेत.

https://www.instagram.com/p/CPU1gfHCmwN/?utm_source=ig_web_button_share_sheet

पंतने मागील काही दिवसांपासून त्याच्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली आहे आणि स्वतःचे वजन देखील कमी केलेले आहे. पंतचा जन्म उत्तराखंड येथील आहे. परंतु तो दिल्ली संघासाठी खेळला आहे. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर तो भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत 20 सामन्यात 1358 धावा, वनडेत 18 सामन्यात 529 धावा, टी20त 33 सामन्यात 512 धावांची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ना धोनी ना सचिन; वनडेत चक्क पळत १०० धावा करणारा ‘हा’ आहे एकमेव भारतीय

मैदानावर दुखापत झाल्याने ‘या’ तीन खेळाडूंना गमावावे लागले प्राण, एका भारतीयाचाही समावेश

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिकिटाची किंमत गगनाला भिडली, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---