सध्या भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये दुसरा कसोटी सामना मीरपूर येथे खेळवला जात आहेे. या कसोटी सामन्याच्या भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज याने भारताच्या पहिल्या डावात धमाकेदार खेळी केली. त्याने भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले, पण तो शतक करण्यात अयशस्वी राहिला. त्याने 93 धावांची झुंजार खेळी केली. जेव्हा पंत फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आला, तेव्हा संघाची स्थिती 3 बाद 72 धावा होती. भारताचा डाव त्यावेळी डगमगला होता आणि विराट कोहली 24 धावांवर बाद झालेला. त्यानंतर त्याने श्रेयस अय्यर सोबत मिळून बांगलादेशवर प्रतिहल्ला केला. त्याच्या या झुंजार खेळीत तो 7 धावांनी शतक बनवण्यात चुकला.
रिषभ पंत (Rishabh Pant) याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतके झळकावली आहेत. मात्र, या दरम्यान तो 6 वेेळा नर्व्हस नाईंटिजचा शिकार बनला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला तो श्रीलंका संघाच्या विरुद्धही तो 96 धावांवर बाद झाला होता. मात्र, यावर पंतचे असे म्हणणे आहे की तो शतक बनवण्यात कमी पडल्याने नाराज नाहीये, कारण त्याची ही खेळी संघाच्या कामी आली. भारतीय महिला संघाची कर्णधार अंजूम चोप्रा (Anjum Chopra) हीच्याशी बोलताना पंतने यावर आपले मत मांडले. तो म्हणाली की, “वैयक्तिकरीत्या मी लॅंडमार्क्सबद्दल विचार नाही करत. माझ्यासाठी शतक म्हणजे फक्त एक संख्या आहे. मी जास्त करुन परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जर त्या परिस्थितीत शतक होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल होत तर ते आपल्या नियंत्रणात नाही.”
पंतने या गोष्टीचा स्वीकार केला की त्याने सहावे शतक झळकावण्याची संधी सोडली. तो म्हणाला की, “एका व्यक्ती म्हणून मी योग्य आहे, कारण मला माहितीये की मी चांगली फलंदाजी करतोय. मी या संधीचा फायदा नाही घेऊ शकलो, पण श्रेयस आणि मी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर आणले यासाठी आम्ही खुष आहोत.” पंत आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्या खेळीमुळे भारतीय संघ पहिल्या डावात 314 धावा करण्यात यशस्वी झाला आणि यजमान संघाविरुद्ध 87 धावांची आघाडी घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राहुलला आता ‘आऊट ऑफ फॉर्म’ म्हणता येईल! 8 वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत ठोकली ‘इतकी’ शतके
धोनीच्या सीएसकेने केला अपमान; आता भिडूने लिलावात साडेचार कोटी घेत रचला इतिहास






