सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात रिषभ पंतनं जोरदार फलंदाजी करत चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यानं केवळ 29 चेंडूत अर्धशतक ठोकून कांगारु गोलंदाजांना सळो की पळो करून टाकलं. यासह पंतनं कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, भारतासाठी सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड देखील रिषभ पंतच्या नावे आहे. त्यानं 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
भारतासाठी कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक
28 चेंडू – रिषभ पंत 2022
29 चेंडू – रिषभ पंत 2024
31 चेंडू – शार्दुल ठाकूर, 2021
31 चेंडू – यशस्वी जयस्वाल, 2024
32 चेंडू – वीरेंद्र सेहवाग, 2008
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात पंत 33 चेंडूत 61 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. आपल्या या खेळीत पंतनं भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा देखील एक रेकॉर्ड मोडला. त्यानं विदेशी भूमीवर कसोटी धावांच्या बाबतीत गौतम गंभीर (1832 धावा) यांना मागे टाकलं आहे. पंतनं आतापर्यंत भारतासाठी विदेशी भूमीवर खेळलेल्या 29 कसोटींमध्ये 1842 धावा केल्या. यात त्याच्या नावे 4 शतक आणि 6 अर्धशतकं आहेत. गंभीरनं विदेशात खेळलेल्या 24 कसोटी सामन्यात 1832 धावा केल्या, ज्यात 4 शतकं आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
याशिवाय रिषभ पंतनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. तो सर्वात जास्त स्ट्राईक रेटने 50 पेक्षा अधिक धावा करणारा खेळाडू बनला. त्यानं 33 चेंडूत 61 धावांची खेळी खेळली, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 184.85 एवढा राहिला.
कसोटीत सर्वाधिक स्ट्राईक रेटने 50+ धावा करणारे भारतीय
184.84 – रिषभ पंत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2025
161.81 – कपिल देव विरुद्ध इंग्लंड, 1982
161.29 – रिषभ पंत विरुद्ध श्रीलंका, 2022
158.33 – शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, 2021
158.13 – केएल राहुल विरुद्ध बांगलादेश, 2024
हेही वाचा –
रिषभ पंतचे अर्धशतक, स्कॉट बोलंडचा कहर, सिडनी कसोटीचा दुसरा दिवस आंबट-गोड
कसोटीत टी20 खेळी..! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पंतनं धो धो धुतलं, रचला ‘विराट’ विक्रम
ॲंकरने ‘थँक्यू रोहित’ म्हटल्यावर हिटमॅनने दिले मुंबई स्टाईल उत्तर, ‘अरे भाई…’