भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखले जाते. तो सामन्यादरम्यान नेहमी यष्टीमागे काही-ना-काही बडबडत असतो. बऱ्याचदा त्याचा आवाज स्टंप माइकमध्ये कैद झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंतने झुंजार शतकी खेळी केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्माने त्याला मुलाखतीमध्ये यष्टीमागे सतत काहीतरी बोलण्यामागचे कारण विचारले. यावर पंतने सर्वांचे मन जिंकणारे उत्तर दिले.
पंतची मुलाखत घेताना रोहितने विचारले की, लोक म्हणत आहेत तू सामन्यादरम्यान यष्टीमागे इतकी बडबड का करत असतो? यावर पंत म्हणाला की, “मला फक्त क्रिकेटचा आनंद लुटायचा असायचो. माझ्या अशा कृत्यामुळे संघाचादेखील उत्साह टिकून राहतो. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, माझ्यामुळे संघाला कशाही प्रकारे मदत मिळावी. हीच गोष्ट माझ्या डोक्यात चालत असते. त्यामुळे सातत्याने यष्टीमागून काहीतरी बोलत असतो.”
Batting approach ????
Vital partnership ????
Fearless mindset ????@RishabhPant17 & @Sundarwashi5 chat up with @ImRo45 after their fine batting show on Day 2 of the 4th Test in Ahmedabad.???????? – By @RajalArora @Paytm #INDvENG #TeamIndiaFull interview ???????? https://t.co/gTGTV2Vhpn pic.twitter.com/mog1gOTD2N
— BCCI (@BCCI) March 5, 2021
एकंदरीत मस्तमौला अंदाजाने संघातील खेळाडूंसह दर्शकांचेही मनोरंजन करण्याचा पंतचा हेतू असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या या भन्नाट उत्तराने सर्वांच्या मनाला भुरळ पाडली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने रोहित-पंतच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती दर्शवली आहे.
भारतीय संघ पहिल्या डावात आघाडीवर
दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, पंतने पहिल्या डावात ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. त्याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. सुंदर १७४ चेंडूत ९६ धावांवर नाबाद राहिला. तर अक्षर पटेलने ९७ चेंडूत ४३ धावा केल्या. यासह भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती ते दुर्दैव! कोणीही साथीदार न उरल्याने सुंदर नव्वदीत नाबाद, ‘या’ भारतीयांवरही आलीय अशी वेळ
चेंडू बघा, शॉट मारा; धुव्वाधार शतकानंतर रिषभने सांगितली आपल्या फलंदाजीची विशेषता






