इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून (४ ऑगस्ट) नॉटिंघम तेथे सुरुवात झाली. भारतीय संघाने सामन्याचा पहिला दिवस आपल्या नावे करून इंग्लंडचा डाव १८३ धावांवर गुंडाळला. या सामन्यात भारतासाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रिषभ पंतने आपल्या एका अनोख्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या नव्या स्टाईलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
रिषभची फंकी स्टाईल
ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत आगळावेगळा गॉगल घालून मैदानात उतरला. त्याचा हा गॉगल इंग्लंडचा अष्टपैलू व इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सॅम करनशी मिळताजुळता होता. त्यानंतर, सोशल मीडियावर याबाबतचे अनेक ट्विट व्हायरल झाले.
एका चाहत्याने ट्विट करत म्हटले, ‘रिषभ पंतने सॅम करनचे गॉगल चोरले’
https://twitter.com/MSDhoniAddicted/status/1422869228735004672
काहींनी रिषभच्या गॉगल घातलेल्या एका छायाचित्राची तुलना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या छायाचित्राशी केली.
https://twitter.com/Walterwhite_Ana/status/1423013189671813122
या सामन्यात रिषभ पंत हा यष्ट्यांमागून भारतीय कर्णधार व गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसून आला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर डॉम सिब्ली बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी भारतीय कर्णधार तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्यासाठी उत्सुक नव्हता. मात्र, रिषभने कर्णधाराचे मन वळवले आणि सिब्ली झेलबाद झाला.
Rishabh pant and his love for goggles is insane.#ENGvIND pic.twitter.com/6zSVBGWUFn
— Rishabh pant FÇ (@rishabpantclub) August 4, 2021
Tag that 'YOU" 😜
Also who looks good with googles? Rishabh Pant, Shane Warne, Sam Curran, ellyse perry or Sarfaraz ahmed #cricket #ENGvIND #INDvENG pic.twitter.com/KzQObXyaoA— All About Cricket (@allaboutcric_) August 4, 2021
https://twitter.com/Shalvi_Rajput07/status/1422940217695113220
भारतीय गोलंदाजांची धमाकेदार कामगिरी
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव ६५ षटकात १८३ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून कर्णधार जो रूटने एकमेव अर्धशतक झळकावले. भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार, शमीने तीन व शार्दुल ठाकूरने दोन बळी आपल्या नावे केले.
महत्त्वाच्या बातम्या –
केकेआरसाठी खुशखबर! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू उर्वरित आयपीएल २०२१ हंगामासाठी उपलब्ध