---Advertisement---

२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’

On: मंगळवार, जानेवारी 22, 2019 3:45 PM
---Advertisement---

आयसीसीने आज (22 जानेवारी) 2018या वर्षाचे पुरस्कार जाहिर केले आहे. यामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ठ वन-डे आणि कसोटी संघाचीही घोषणा केली आहे.

भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंत हा या वर्षाचा सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याला वर्षातील 11 जणांच्या सर्वोत्कृष्ठ कसोटी संघातही स्थान मिळाले आहे.

यावर्षी इंग्लंड दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण करताना पंतने शतक केले होते. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने शेवटच्या कसोटीमध्ये नाबाद 159 धावांची खेळी केली होती. यामुळे या दोन्ही देशात शतक करणारा तो पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला होता.

पंतने फलंदाजी बरोबर यष्टीरक्षणातही उत्तम कामगिरी करत विक्रम केले आहेत. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एडलेड कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे तो यष्टीमागे 11 झेल घेणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला होता.

त्याचबरोबर एका कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाशीही त्याने बरोबरी केली होती. एका कसोटी सामन्यात यष्टीमागे 11 झेल घेण्याचा पराक्रम याआधी जॅक रसेल आणि एबी डेविलियर्स यांनी केला आहे.

पंतने या वर्षात 8 कसोटी सामने खेळताना 537 धावा केल्या आहेत. तर यष्टीमागे 44 झेल आणि 2 यष्टीचीत केले आहेत.

आयसीसीच्या कसोटी संघात पंत बरोबर भारतीय कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

किंग कोहलीच्या टीम इंडियाला आहे न्यूझीलंडमध्ये हा मोठा पराक्रम करण्याची संधी

२२ जानेवारी डेव्हिड वार्नरसाठी ठरणार जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment