आगामी इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तत्पूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. भारताचा स्टार डावखुरा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएलच्या या हंगामात लखनऊचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान कर्णधार झाल्यानंतर पंतने पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला, “मी माझ्या सर्व कर्णधारांकडून खूप काही शिकलो आहे. रोहित शर्माकडून तुम्ही खेळाडूची काळजी कशी घ्यायची हे शिकता. त्याच्या नेतृत्वातून मी हे शिकलो आहे आणि कर्णधार म्हणून मी ते पुन्हा करू इच्छितो.” पुढे बोलताना तो म्हणाला, “माही भाईचे शब्द खूप प्रसिद्ध आहेत. एमएस धोनीने सांगितले होते की प्रक्रियेचे अनुसरण करा, म्हणजे निकाल आपोआप येतील. मी हे लक्षात ठेवेन.”
लखनऊ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी रिषभ पंतसोबत (Rishabh Pant) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की पंत लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करेल. यासोबतच, त्यांनी दावा केला की पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महान कर्णधार बनेल. पुढे बोलताना गोयंका म्हणाले, “सध्या लोक आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत ‘माही (एमएस धोनी) आणि रोहित’ असे म्हणतात. माझे शब्द लक्षात ठेवा. 10-12 वर्षांनी, ते ‘माही, रोहित आणि रिषभ पंत’ म्हणतील.”
आयपीएल 2025साठी सर्व संघांचे कर्णधार-
लखनऊ सुपर जायंट्स- रिषभ पंत
चेन्नई सुपर किंग्ज- रूतुराज गायकवाड
गुजरात टायटन्स- शुबमन गिल
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
मुंबई इंडियन्स- हार्दिक पांड्या
पंजाब किंग्ज- श्रेयस अय्यर
सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- कर्णधार जाहीर नाही
कोलकाता नाईट रायडर्स- कर्णधार जाहीर नाही
दिल्ली कॅपिटल्स- कर्णधार जाहीर नाही
रिषभ पंतच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 35.31च्या सरासरीने 3,284 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 148.93 आहे. आयपीएलमध्ये पंतने 18 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 128 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा
या तारखेपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये बदल शक्य, या खेळाडूंना अजूनही संधी?
BCCI चे नवे नविन कागदापुरते की प्रत्यक्षात अंमलात? पाहा टीम इंडियामध्ये चालयं तरी काय!