---Advertisement---

दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…

On: मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024 1:05 PM
Rishabh Pant IPL
---Advertisement---

आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. भारतीय खेळाडू रिषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्सनं लिलावात त्याच्यावर 27 कोटी रुपये खर्च केले. पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. पंतच्या आगमनामुळे लखनऊचा संघ आणखी मजबूत झाला आहे.

रिषभ पंतचा आयपीएल रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पंत लखनऊसाठी मॅचविनर खेळाडू ठरू शकतो. भीषण कार अपघातानंतर त्यानं ज्या प्रकारे पुनरागमन केलं, ते खूप प्रेरणादायी आहे. पंत दिल्ली कॅपिटल्ससोबत दीर्घकाळ जोडला गेला होता. आता त्याचा संघासोबतचा प्रवास संपला आहे. पंतनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिल्ली कॅपिटल्सच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

रिषभ पंतनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यानं आयपीएल सामन्याच्या आनंदाच्या क्षणांचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला. पंतन कॅप्शनमध्ये लिहिलं, “दिल्ली कॅपिटल्ससोबतचा माझा प्रवास खूपच अप्रतिम होता. मैदानासह मैदानाबाहेरील रोमांचक क्षण खूप एंजॉय केले. मी येथे तरुण वयात आलो होतो आणि गेल्या नऊ वर्षांत एकत्र वाढलो.”

रिषभ पंतनं चाहत्याचंही आभार मानलं आहे. तो चाहत्यांना उद्देशून म्हणाला, तुम्ही मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या आयुष्यातील एका कठीण टप्प्यात माझ्या पाठीशी उभे राहिले. मी पुढे जात असताना तुमचं प्रेम आणि पाठिंबा माझ्यासोबत ठेवतो. जेव्हा मी मैदानात उतरेन तेव्हा मी तुमचं मनोरंजन करण्यास तयार असेल. माझं कुटुंब बनल्याबद्दल आणि हा प्रवास इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद.” तुम्ही रिषभची ही पोस्ट येथे पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

 

रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचं नातं एक-दोन वर्षांचं नाही तर तब्बल नऊ वर्षांचं आहे. मात्र तो आता आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.

हेही वाचा – 

लिलावात करोडपती झालेल्या 13 वर्षीय खेळाडूवर वयाच्या फसवणुकीचा आरोप
कोच गंभीर ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून मायदेशी परतला! कारण जाणून घ्या
आयपीएलचं एक पर्व संपलं! वॉर्नरसह या 5 दिग्गजांना लिलावात खरेदीदार मिळाला नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---