आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात रिषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर पंत आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की पंतला आयपीएलचे संपूर्ण 27 कोटी रुपये मिळणार नाहीत. त्याच्या रकमेतील मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. चला तर मग जाणून घेऊया की 27 कोटी रुपयांपैकी पंतला टॅक्स कापल्यानंतर किती पगार मिळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोट्सनुसार, पंतला सरकारला कर म्हणून 8.1 कोटी रुपये द्यावे लागतील. त्यानंतर रिषभला 27 कोटी रुपयांपैकी केवळ 18.9 कोटी रुपये आयपीएल पगार म्हणून मिळतील.
आयपीएल 2025 पूर्वी कोणताही खेळाडू दुखापत झाल्यास, संघ बदली म्हणून दुसऱ्या खेळाडूचा समावेश करू शकतो. त्याचवेळी, टीम इंडियाकडून खेळताना भारतीय खेळाडूला दुखापत झाल्यास, त्याला त्याचे पूर्ण वेतन मिळेल कारण बीसीसीआय भारतीय खेळाडूंना विमा प्रदान करते.
सध्या पंत बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आता मालिकेतील दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडच्या ओव्हलवर खेळवली जाणार आहे. ज्यासाठी पर्थ कसोटीनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सराव करत आहे.
रिषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतकेही केली आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 128* धावा आहे. पंतने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो 2016 ते 2024 या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला आहे. आता पंत पहिल्यांदाच 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या माध्यमातून दुसऱ्या संघासाठी आयपीएल खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा-
या दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रश्न सुटणार! आयसीसीने आखली विशेष योजना
NZ VS ENG; या दोन महान खेळाडूंच्या नावावर कसोटी मालिका, ट्रॉफीमध्ये बॅटचाही वापर
CSK full squad; या खेळाडूच्या परतण्याने चेन्नईचा संघ आणखी बलशाली! यंदा ट्राॅफी उंचवणार?