---Advertisement---

पंतच्या शोधात ‘या’ खेळाडूंकडे झाले दुर्लक्ष, सोशल मीडियावरील युझर्सच्या तिखटं प्रतिक्रिया एकदा बघाच

Pant-
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा आणि महत्वाचा टी२० सामना शुक्रवारी (दि.१७ जून) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळण्यात आला. एकूण पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील हा चौथा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा होता. याचे कारण ५ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर होता. त्यानंतर या ‘करो वा मरो’ च्या सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. मात्र भारताचा कर्णधार रिषभ पंतला पुन्हा एकदा अपयशी ठरला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नेमला गेलेला भारताचा कर्णधार रिषभ पंतच्या बॅट मधुन धावा आल्याच नाहीयेत. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात मात्र ४० धावा केल्या होत्या. तर चौथ्या सामन्यातही तो १७ धावाच बनवु शकला. त्याच्या या खराब प्रदर्शनामुळे त्याला खुप टीकांना सामोरे जावे लागत आहे. कित्येत लोक जण त्याच्याऐवजी संजु सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात यावी असे ही म्हणत आहे.

रिषभ पंतने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या चौथ्या सामन्यात केवळ १४.२५ च्या सरासरीने ५७ धावा केल्या आहेत. त्याच्या धावा बनवण्याच्या गतीमध्ये देखील घट झालेली दिसुन येत आहे. या मालिकेत त्याने फक्त १०५.५५ च्या धावगतीने धावा बनवल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये त्याने एक अर्धशतकही देखील बनवले नाहीये. याचमुळे त्याला सोशल मीडियावर खुप ट्रोल केले जात आहे. युझर्स म्हणत आहेत की, आपण रिषभ पंतला शोधताना आपण संजु सॅमसन आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर रिषभ पंतवर मीमस् चा वर्षाव केला आहे.

https://twitter.com/Jaammiing/status/1537818487946477572?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1537818487946477572%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fsocial-media-reaction-on-rishabh-pant-after-flop-performance-in-ind-vs-sa-t20-series-2148974

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर होता. त्यानंतर या ‘करो वा मरो’ च्या सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. तर १९ जुलै २०२२ रोजी बॅंगलोर येथे खेळला जाणार आहे. तर सामना जिंकुन मालिका आपल्या खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘याच’ खेळाडूंना मिळणार इंग्लंड दौऱ्यात संधी, द्रविडचे नाव घेत गांगुलीने दिले संकेत

तोंडचा घास पळाला! एवढे करून पण बटलर डिविलीयर्सचा तो विक्रम मोडू शकला नाही

अरे व्वा! केकेआरनंतर आता ‘या’ क्रिकेट संघाचा मालक बनला शाहरुख खान, पहिल्या सामन्यासाठी उत्सुक

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---