भारत आणि श्रीलंका यांच्यातील मंगळवारी (3 जानेवारी) पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. उभय संघांत जानेवारी महिन्यात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. उभय संघांतील टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी शुक्रवारी (3 डिसेंबर) भारतीय संघाला मोठा धक्का बसला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा भीषण अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. पंतच्या अपघाताविषयी श्रीलंकेविरुद्धच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या हार्दिक पंड्याने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. अशात रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) कर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. ही मालिका सुरू होण्याआदी माध्यमांशी बोलतान हार्दिक असेही म्हणाला की, रिषभ पंत (Rishabh Pant) संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. पण अपघातानंतर आता पंत पुढचा मोठा काळ संघातून बाहेर राहणार आहे. अशात पंत लवकरार लवकर बरा व्हावा, अशी इच्छाही हार्दिकने व्यक्त केली.
हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्याआधी सोमवारी (2 जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना हार्दिक म्हणाला की, “जे घडले ते, खूपच दुर्दैवी होते. पण आपण या गोष्टी नियंत्रित करू शकत नाही. एका संघाच्या रूपात आपण पंत लवकर बरा होण्याची आशा व्यक्त करू शकतो. आमच्या प्रार्थना नेहमीच त्याच्यासोबत आहेत. तो खूप महत्वाचा खेळाडू आहे, पण आता परिस्थिती काय आहे हे सर्वांनाच माहिती आहे की.”
दरम्यान, पंत श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत अपघात झाला नसता, तरीही खेळणार नव्हात. निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेदरम्यान विश्रांती दिली होती. हार्दिक पंड्याच्या मेत पंत संघातून बाहेर असताना इतरांसाठी ही एक संधी आहे. भारतीय संघाला फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेत पंत संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता, मात्र अपघातानंतर तो या मालिकेतून जवळपास बाहेरच पडला आहे. (Rishabh Pant is important for the team! A big reaction from the captain ahead of the series against Sri Lanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम
जबरदस्त योगायोग! ‘या’ फलंदाजाने ठोकले 2022 आणि 2023चे पहिले आंतरराष्ट्रीय शतक, केल्या सारख्याच धावा