न्यूझीलंडविरुद्ध बेंगळुरू कसोटीत कहर करणाऱ्या रिषभ पंतने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे. चौथ्या दिवशी सर्फराज खानसोबत फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने अवघ्या 55 चेंडूत आपले 12 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील 2500 धावाही पूर्ण केल्या. धोनीला मागे टाकत रिषभ पंत आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे. पंतने 62 व्या डावात हे यश मिळवले. तर धोनीच्या नावावर हा विक्रम 69 डावात नोंदवला गेला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी केवळ 4 यष्टिरक्षकांनी 2500 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत एमएस धोनी आणि रिषभ पंत यांच्याशिवाय फारुख इंजिनियर आणि सय्यद किरमाणी यांचा समावेश आहे.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2500 धावा करणारा यष्टिरक्षक-
रिषभ पंत- 62* डाव
एमएस धोनी- 69 डाव
फारुख इंजिनियर- 82
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक-
एमएस धोनी- 4876
सय्यद किरमाणी- 2759
फारुख इंजिनियर- 2611
रिषभ पंत- 2505*
चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने 344 धावा ठोकल्या होत्या. सर्फराज खान 125 धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. तर रिषभ पंतने देखील 53 धावा केल्या आहेत. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली आहे. भारत आता न्यूझीलंडपेक्षा फक्त 12 धावांनी मागे आहे.
टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या 46 धावांवर ऑलआऊट झाली, त्यानंतर न्यूझीलंडने 402 धावा केल्या आणि भारतावर 356 धावांची आघाडी घेतली. एवढ्या वाढलेल्या आघाडीनंतरही भारतासाठी हे शानदार पुनरागमन आहे. भारतीय संघ आता 344-3 अश्या स्थितीत आहे. जर भारताने हा सामना जिंकला किंवा अनिर्णाीत केल्या टीम इंडियासाठी हा ऐतिहासिक सामना ठरेल.
हेही वाचा-
पावसाचा भारताला फायदा! 46 धावांवर ऑलआऊट होऊनही रोहित-सेना इतिहास रचण्याच्या मार्गावर…
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!
पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा