---Advertisement---

आता रोखून दाखवा! आयपीएल कमबॅकसाठी रिषभ पंत रेडी, सराव सामन्यात पाडला धावांचा पाऊस

On: बुधवार, फेब्रुवारी 21, 2024 6:20 PM
Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत लवकरच प्रेफेशनल क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. डिसेंबर 2022 मध्ये त्याचा अपघात झाला होता. अपघातानंतर यष्टीरक्षक फलंदाजावर काही मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. तसेच फिटनेस मिळवण्यासाठी दोन जवळपास दीड वर्षापासून बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. पंतने नुकताच एक सराव सामना खेळला आहे. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) पुनरागमन करू शकतो. यष्टीरक्षक फलंदाजाकडून तसे संकेत देखील मिळाले आहेत. मंगळवारी (21 फेब्रुवारी) याविषयी बातम्या समोर आल्या होत्या की, पंतने आयपीएलमध्ये पुरागमन करण्यासाठी सराव सुरू केला आहे. माहितीनुसार बेंगलोरच्या अलुरमध्ये पंतने एक सराव सामना देखील खेळला. आता याच सामन्यात व्हिडिओ समोर येत आहे. व्हायरल व्हिडिओत रिषभ पंत अबरदस्त फटकेबाजी करताना दिसत आहे.

रिषभ पंत भारतीय क्रिकेट संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. पण 30 डिसेंबर 2022 रोजी त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी घराकडे निघालेल्या पंतची गाडी प्रवासादरम्यान पलटी झाली. सुदैवाने पंत वेळेत बाहेर पडला आणि नंतर गाडीने पेट घेतला. यष्टीरक्षक फलंदाजाचे जीव देखील या अपघातात जाऊ शकत होता. पण स्थानिकांनी त्याला मदत केल्यामुळे तो वाचला. अपघातात त्याच्या संपूर्ण शरीरावर दुखापत झाला होती. पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते. या सर्व दुखापतींवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच आपली जुनी फिटनेस मिळवण्यासाठी मागच्या एका वर्षात त्याने बेंगलोरच्या एनसीएमध्ये मेहनत देखील घेतली आहे. अशात तो प्रत्यक्षात पुन्हा कधी भारतीय जर्सीमध्ये दिसणार याची चाहते वाट पाहत आहेत. (Rishabh Pant is ready to make a comeback on the field from IPL)

महत्वाच्या बातम्या – 
AUS Vs NZ : पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या बॉलवर थरारक विजय, न्यूझीलंडला 6 विकेट्सने दिली मात
Ajinkya Rahane । अजिंक्य रहाणेच्या घरी ‘नू फॅमिली मेंबर’, कसोटी स्पेशलिस्टने केला तीन कोटींचा खर्च

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---