इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाची सुरुवात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आगामी आयपीएल हंगामाची चर्चा आता कुठे सुरू झाली असताना चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीत क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आघामी आयपीएल हंगामात खेळताना दिसू शकतो. पुनरामनानंतर पंत पुन्हा एकदा दिल्लीच्या कर्णधाराची भूमिका पार पाडताना दिसण्याची शक्यता आहे.
30 डिसेंबर 2022 रोजी रिषभ पंत (Rishabh Pant) याचा कार अपघात झाला होता. अपघात एवढा गंभीर होता की, पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने यष्टीरक्षक फलंदाजाचा जीव वाचला. असे असेल तरी, मागच्या मोठ्या काळापासून पंत दुखापतीमुळे क्रिकेट खेळू शकला नाहीये. पण आयपीएल 2024 मधून तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे, अशा बातम्या समोर येत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार पंत आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी फलंदाजी करताना दिसू शकतो. सोबतच संघाचे नेतृत्व देखील त्याच्याकडे सोपवले जाऊ शकते. असे असले तरी, यष्टीरक्षकाची भूमिका तो इतक्यात स्वीकारणार नाही.
Major updates on Rishabh Pant: [Cricbuzz]
– Actively involved in warm up games in Alur.
– Showing positive signs on recovery.
– Set to return as pure Batter in IPL 2024. pic.twitter.com/DLFPZwz6wR— Johns. (@CricCrazyJohns) February 20, 2024
Rishabh Pant won’t be wicketkeeping in IPL 2024. (Cricbuzz).
– He’ll play as a batter and as a captain! pic.twitter.com/wPtIhNX7VT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2024
क्रिकबजच्या माहितीनुसार पंत बेंगलोरजवळ अलूरमध्ये एका सराव सामन्यात सहभागी झाला आहे. यासामन्यात पंतच्या फिटनेसबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मोठ्या काळानंतर पंतने एखादा सामना खेळला आहे. बीसीसीआय आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल फ्रँचायझीच्या सूत्राकडून अशी महिती मिळाली आहे की, 26 वर्षीय पंत आगामी आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसेल. माहितीनुसार सध्या रिषभ पंत बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. (Rishabh Pant is set to return in IPL 2024 as pure Batter & Captain)
महत्वाच्या बातम्या –
‘जयस्वाल तुमच्याकडून शिकला नाही…’, बॅझबॉलच्या हवेत असेलल्या इंग्लंडला नासिर हुसेनकडून घरचा आहेर
‘मी त्याला फोन केला पण…’, चहलला रिलीज केल्यानंतर आरसीबीमध्ये काय घडलं?