---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत पंतची विश्वविक्रमाला गवसणी, बनला जगातील पहिला आणि एकमेव यष्टीरक्षक

Rishabh-Pant
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर पाचवा पुनर्निधारित कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३०० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या आहेत. भारतीय संघाला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा मोठा वाटा आहे. पंतने या सामन्यात शानदार शतक केले आहे आणि विक्रमांची रास घातली आहे.

१११ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि २० चौकारांच्या मदतीने त्याने १४६ धावांची खणखणीत खेळी केली आहे. या शतकी खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमधील त्याच्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. ३१ कसोटी सामन्यातील ५२ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने २०६६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने ही कमाल केली आहे. यासह तो सर्वात तरुण वयात कसोटीतील आपल्या २००० धावा पूर्ण करणारा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. 

विशेष म्हणजे, पंतने आतापर्यंत खेळलेल्या ३१ पैकी केवळ ८ सामने मायदेशात अर्थात भारतात खेळले आहेत. म्हणजे त्याने अर्ध्यापेक्षा जास्त धावा परदेशात काढल्या आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दिग्गज यष्टीरक्षकांच्या यादीत सहभागी
याखेरीज पंत इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत सहभागी झाला आहे. पंतचे हे इंग्लंडविरुद्धचे कसोटीतील तिसरे शतक होते. पंत ही विक्रमी करणारा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज आहे. ब्रॅड हॅडिन आणि ऍडम गिलख्रिस्ट, हे दिग्गज यष्टीरक्षकच केवळ हा विक्रम साध्य करू शकले आहेत. त्यांनीही इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी ३ शतके केली आहेत.

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणारे यष्टीरक्षक-
३: रिषभ पंत (२० डाव)*
३: ऍडम गिलख्रिस्ट (२८ डाव)
३: ब्रॅड हॅडिन (३५ डाव)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

श्रेयस अय्यरचा झेल टिपताना जगाने पाहिला ‘उडता बिलिंग्स’, पाहा व्हिडिओ

पंतने एका दगडात मारले तीन पक्षी! शतक झळकावत ठरलाय धोनीपेक्षाही महान

अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम, वाचा एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---