आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाकडे सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षणाचे अनेक पर्याय आहेत. चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी संघाची निवड झाल्यावर या सर्व पर्यायांचाही विचार केला जाईल. काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यासाठी निवडले जाईल, तर काही खेळाडूंची संघात बॅकअप म्हणूनही निवड केली जाईल. या बातमीद्वारे आपण अशा 3 यष्टीरक्षकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांची चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.
1) रिषभ पंत- रस्ता अपघातात जखमी झाल्याने रिषभ पंत (Rishabh Pant) वनडे विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट नव्हता. त्यामुळे त्याची या स्पर्धेसाठी निवडही झाली नाही. मात्र, आता त्याचे पुनरागमन झाले आहे. पंत आधी भारताकडून तिन्ही फाॅरमॅटमध्ये सतत खेळायचा. पण त्याला आता पुन्हा आपले स्थान संघात निश्चित करायचे आहे. पंतचा अनुभव लक्षात घेता चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी त्यांची भारतीय संघात निवड होऊ शकते.
2) संजू सॅमसन- संजू सॅमसनने (Sanju Samson) गेल्या काही वर्षांत मर्यादित षटकांमध्ये भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 3 शतके झळकावणाऱ्या संजूची टी20 संघात यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. तथापि, त्याला वनडे क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी अजूनही प्रयत्न करावे लागतील. दरम्यान निवडकर्ते संजूच्या नावाचा यष्टीरक्षक म्हणून नक्कीच विचार करू शकतात.
3) केएल राहुल- जेव्हा भारत 2023 मध्ये वनडे विश्वचषक खेळला, तेव्हा केएल राहुल (KL Rahul) यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळला होता. राहुलने वनडे क्रिकेटमध्ये 450 हून अधिक धावा करून यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात आपले स्थान पक्के केले होते. वनडे विश्वचषकात राहुलला यष्टीरक्षक बनवण्यात आले, त्यावेळी भारताकडे रिषभ पंत नव्हता. मात्र, असे असूनही यष्टिरक्षण आणि फलंदाजी या दोन्हीकडे पाहता राहुलची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या मार्टिन गुप्टिलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
रोहित-विराटचा गेलेला फॉर्म कसा परत येईल? रवी शास्त्रींनी सांगितला रामबाण उपाय
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून केएल राहुलचा पत्ता कट होणार? या दिग्गज खेळाडूचं स्थानही धोक्यात