मुंबई । एमएस धोनीने 15 ऑगस्ट दिवशी शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. भारताला वनडे विश्वचषक, टी 20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्या धोनीने 16 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. धोनीच्या निवृत्तीमुळे त्याचे चाहते, सहकारी खेळाडू आणि अनेक परदेशी खेळाडू भावूक झाले. अनेक चाहते धोनी सारखा क्रिकेटपटू शतकातून एकदाच जन्माला येतो अशी प्रतिक्रिया देत आहेत.
धोनीच्या निवृत्तीनंतर दोन भारतीय खेळाडूंना सुखाची झोप येत असेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स यांनी ट्विटरवरून दिली.
डीन जोन्स यांनी ट्विट केले आहे की, “मी पैज लावतो की केएल राहुल आणि रिषभ पंत यांना धोनीच्या सेवानिवृत्तीनंतर शांत झोप येत असावी.” डीन जोन्सने या ट्विटद्वारे आता हे दोन्ही खेळाडू आता विकेटकीपिंगच्या शर्यतीत पूर्णपणे सहभागी होतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यात यष्टिरक्षकाची जागा मिळविण्यासाठी जोरदार झुंज सुरू आहे. मात्र, धोनीच्या जागी संघाने रिषभ पंतला संपूर्ण संधी दिली गेली, पण त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. तसेच त्याची विकेटकीपिंगही खराब होती. यानंतर, भारतीय संघाने केएल राहुलला यष्टिरक्षक आणि फिनिशरची भूमिका सोपविली, ज्यामध्ये तो पूर्णपणे यशस्वी ठरला. सन 2019 मध्ये केएल राहुलने 70 च्या सरासरीने धावा केल्या.
न्यूझीलंड दौर्यावर, केएल राहुलने पाचही टी 20 सामन्यांमध्ये यष्टिरक्षण केले, ज्यात त्याने 3 झेल आणि 2 स्टम्पिंग केले. 2019 मध्ये टी -20 मध्येही 53 च्या सरासरीने राहुलने धावा केल्या. केएल राहुल यष्टीरक्षक म्हणून उत्तम कामगिरी करत आहे हे स्पष्ट झाले आहे. पण रिषभ पंतची पुनरागमाची वाट थोडी कठीण जात आहे. पण धोनीच्या निवृत्तीनंतर आता हा सामना या दोघांमध्ये राहिला आहे. कारण जर धोनी निवृत्त झाला नसता तर तो इच्छेनुसार संघात परतू शकला असता. कदाचित यामुळेच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर डीन जोन्स म्हणाले होते की, धोनीच्या निवृत्तीनंतर केएल राहुल आणि रिषभ पंत हे सुखाची झोप घेत असतील.